घर महाराष्ट्र Sanatana Dharma row : जितेंद्र आव्हाड म्हणतात - मी हिंदू, पण सनातनी...

Sanatana Dharma row : जितेंद्र आव्हाड म्हणतात – मी हिंदू, पण सनातनी नाही…

Subscribe

मुंबई : द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते. भाजपासह देशभरातील विविध हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. यावर आता राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट रीट्वीट करत हिंदू आणि सनातनी (हिंदुत्ववादी) यामधील फरक सांगितला आहे. तसेच मी हिंदू, पण सनातनी नाही… असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच चेन्नईमध्ये एका सभेत सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना यासारख्या आजारांसोबत केली होती. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे भाजपसह देशभरातील अन्य हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी दिल्लीपासून अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अयोध्येतील पुजारी परमहंस आचार्य यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. तर आंध्र प्रदेशातील एका हिंदुत्ववादी संघटनेने स्टॅलिन यांच्या श्रीमुखात मारणाऱ्याला 10 लाख रुपये रोख देण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – 2011 ते 2021 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले; NCRB ची आकडेवारी

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. भाजपाने आपल्या वक्तव्याची तोडमोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी एका कार्यक्रमात सनातन धर्मबद्दल बोललो. मी जे काही बोललो, ते पुन्हा पुन्हा सांगेन. मी फक्त हिंदू धर्मच नव्हे तर यात सर्व धर्मांचा समावेश केला आहे. मी जातीभेदांबद्दल बोललो. त्याचाही निषेध केला, असे उदयनिधी यांनी सांगितले.

हेही वाचा – कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मराठा समाजाला आवाहन

या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट रीट्वीट करत, हिंदू आणि सनातनी (हिंदुत्ववादी) यामधील फरक सांगितला आहे. पाखंडावर प्रहार करणारे तुकाराम महाराज हिंदू, त्यांना छळून त्यांचे अभंग पाण्यात बुडवणारे सनातनी; ज्ञानोबा माऊली हिंदू, त्यांच्या पालकांना आत्महत्या करायला लावणारे सनातनी; छत्रपति शिवाजीराजे हिंदू, त्यांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी, राजर्षी शाहू महाराज हिंदू, त्यांना प्राणपणाने विरोध करणारे सनातनी, स्त्रीला शिकवून पंख देणारे महात्मा फुले हिंदू, त्यांच्यावर मारेकरी घालणारे सनातनी; इतरांना शिकवण्यासाठी स्वतः शिक्षण घेणारी क्रांतिज्योती सावित्री हिंदू, त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकणारे सनातनी; भारत एकत्र ठेवू पहाणारे हिंदू, धर्माच्या आधारावर देश तोडणारे सनातनी; सर्वांना सामावून घेणारे हिंदू, सर्वांचा द्वेष करणारे सनातनी; लोकशाही मानणारे हिंदू, मनुशाहीचे स्वप्न बघणारे सनातनी; देव-धर्मावर श्रद्धा असणारे हिंदू, देव-धर्माचा वापर करणारे सनातनी, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -