घरमहाराष्ट्रMadha Lok Sabha : धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपाला रामराम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत...

Madha Lok Sabha : धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपाला रामराम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत असताना आज शुक्रवारी (ता. 12 एप्रिल) माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशानंतर मोहिते पाटील यांना शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आहे. मोहिते – पाटील यांच्या पक्षांतराने माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. (Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil resigned from BJP)

भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबियांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कायम ठेवत माढा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी भाजपाकडे करण्यात आली होती. पण भाजपाने ही मागणी फेटाळून लावल्याने मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर माढा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे सांगण्यात येते. मोहिते पाटील यांना फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : गजानन कीर्तिकरांचे शरीर मुख्यमंत्री शिंदेंसोबत, पण आत्मा ठाकरेंसोबत; अमित साटमांची टीका

धैर्यशील मोहिते पाटील हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी 14 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. तर 16 एप्रिलला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असून त्यानंतर अकलूजमध्ये जाहीर प्रचार सभा होईल, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजीनामा पत्र लिहिले आहे. या पत्रात मी भाजपा सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ, इत्यादी संघटना रचना गठित करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र सुपर वॉरियर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना आणि बूथच्या माध्यमातून पक्षाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. पण माझ्या वैयक्तिक कारणास्तव भाजपाच्या सर्व पदांचा आणि भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना देश तोडायचा आहे, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -