घरमहाराष्ट्रराज्यात शेतकरीविरोधी कायदा लागू होऊ देणार नाही

राज्यात शेतकरीविरोधी कायदा लागू होऊ देणार नाही

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक दौऱ्यात शेतकऱ्यांना दिली ग्वाही

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयक पारित केले असले तरीही राज्यात मात्र ते कायदे लागू होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. आम्ही नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. सध्या राज्यभरात कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले असले तरीही तिसर्‍या लाटेची भीती मात्र कायम आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ठ्य आम्ही ठेवले आहे. तिसर्‍या लाटेत ३० वर्षांखालील व्यक्तींना सर्वाधिक धोका असल्याने, या वयोगटाकडेही लक्ष केंद्रीत केले आहे. ही लाट येऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, हे संकट आलेच तर त्याला सामोरे जाण्यासाठीही आरोग्य व्यवस्था सज्ज आहे. लसनिर्मितीकडे सरकारने लक्ष केंद्रीत केल्याने हे उद्दीष्ठ्य पूर्ण होईल, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -