घरमहाराष्ट्रसंध्याकाळपर्यंत थांबा मग निर्णय घेऊ - जानकर

संध्याकाळपर्यंत थांबा मग निर्णय घेऊ – जानकर

Subscribe

कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर महादेव जानकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये महादेव जानकर यांना धक्का बसला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा जानकरांना होती. मात्र, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये जानकरांचा पत्ता कट करत त्या जागी रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात राजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. संध्याकाळपर्यंत थांबा त्यानंतर निर्णय घेऊ असं या बैठकीत महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना महादेव जानकर म्हणाले की, सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असणार आहे. रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला. आत्तापण दोन वेळा आला. त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या, आजही शिर्डी, परभणीचा उमेदवार तयार आहे. काही मतदार संघ रासपला सोडा आणि तिथे सेना-भाजपसमोर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, असं सांगत महादेव जानकर यांनी संध्याकाळपर्यंत थांबा आणि मग निर्णय घेऊया असे, कार्यकर्त्यांना सांगितले.

- Advertisement -

२०१४ च्या निवडणुकीआधी रासपचे नेते महादेव जानकर भाजपमध्ये आले. मात्र त्यांना नेहमीच भाजपमध्ये मनाप्रमाणे जागा आणि पदं दिली जात नसल्याचा वारंवार दावा त्यांचे कार्यकर्ते करत आले आहेत. आता तर जानकरांना यंदाच्या निवडणुकित उमेदवारी न दिल्याने तसंच त्याच्याच पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्यामुळे जानकर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी पुण्यामध्ये पक्षाचा मेळावा आणि बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करुन जानकर नेमका काय निर्णय घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

महादेव जानकरांचा पत्ता कट; भाजपने केली ‘कुल’ खेळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -