घरमहाराष्ट्रबचतगटांच्या वस्तूंची आता जिल्ह्यातच विक्री शक्य

बचतगटांच्या वस्तूंची आता जिल्ह्यातच विक्री शक्य

Subscribe

राज्यातील ३४ हजार गावात ३ लाखापेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटामार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केली. तसेच बचतगटांना उत्पादन आणि व्यवस्थापना संदर्भात प्रशिक्षणही देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात ग्राम विकास आणि पंचायत राज विभागातर्फे महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन २ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनाबद्दल माहिती घेतली.

- Advertisement -

महिला बचतगटांच्या चळवळीत राज्यातील ३८ लक्ष कुटुंब जोडले गेले असून या माध्यमातून एक व्यावसायिक साखळी निर्माण झालेली आहे. लोकसंख्येच्या ५० टक्के असलेल्या महिला शक्तीचा देशाच्या उत्पन्नात वाटा असल्याखेरीज देश पुढे जाणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रमुख भूमिका महिला करू शकतात. पाच लाख कुटूंबाची उपजीविका चालवणारी बचतगटाची चळवळ ५०० कोटीची उत्पादन क्षमता ठेवते. महिलासाठींच्या वेगवेगळ्या योजनांना आतापर्यंत ४२ हजार कोटीचे अर्थसहाय दिले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिला कर्ज बुडवत नाहीत

बचतगटाच्या चळवळीत बँकांनी दिलेल्या सहकार्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी नामोल्लेख केला. महिला बचतगट कर्ज बुडवत नाहीत किंबहुना वेळेच्या आधी कर्ज चुकते करतात, असा अनुभव असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कुशल मनुष्यबळाची देशात बरीच मागणी आहे.

- Advertisement -

महालक्ष्मी सरसचे नागपुरात पहिल्यांदा आयोजन होत असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. महिलांना रोजगार मिळवुन देणे, हाच शासनाचा अग्रकम राहिला आहे. नागपूरात बचतगटांच्या महिलांना हरित क्षेत्र विकास उपक्रमाद्वारे १ हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत रामटेक, काटोल या तालूक्यातील मच्छिमारांच्या आणि पशुसंवर्धन करणाऱ्या बचतगटासाठी ५० कोटीचे अनुदान देण्यात आले आहे. वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून विविध उत्पादन देखील महिला करू शकतात. जिल्ह्यातील १० हजारावर महिलांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराचा लाभ मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -