घरBudget 2024Maharashtra Budget Session : "तुम्ही केवळ घोषणा, आम्ही भरीव मदत केली", मुख्यमंत्र्यांचा...

Maharashtra Budget Session : “तुम्ही केवळ घोषणा, आम्ही भरीव मदत केली”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत त्यांना उत्तर दिले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 293 अंतर्गत प्रस्ताव मांडत अंतरिम अर्थसंकल्पातून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका केली. त्यांच्या शेतकऱ्यांवरील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना लागू करण्यात आल्या, किती रुपये रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती दिली. (Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde’s attack on the opposition on the issue of farmers)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : इकबाल सिंह चहल यांचा मुद्दा गाजला, वडेट्टीवारांकडून सरकारची पोलखोल

- Advertisement -

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला अन्न मिळते हे आपण मान्य केले पाहिजे. सरकार म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी योजना लागू केल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत 16 हफ्त्यांमध्ये 29 हजार 520 कोटी रुपये बँकेत जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या हफ्त्यापोटी 1720 कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्यापोटी 3 हजार 800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यातून 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. एकूण 5 हजार 520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत देण्यात आली.

तर, याच मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही तपास करा. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो. खोटे बोलत नाही. दिलेला शब्द पाळतो हे तुम्ही पाहिले आहे. या योजनेअंतर्गत 35 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचायचे असे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटले होते. पण आता लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण एक रुपया जातो. पण जर का आता तुमचे सरकार असते तर 35 हजार कोटी रुपये आले असते. पण त्यापैकी 30 हजार कोटी रुपये हडप झाले असते. फक्त 5 हजार कोटी पदरात पडले असते, असा सणसणीत टोलाच शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. पण आता आमचे सरकार आहे. डबल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय, असेही एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

वशिष्टी नदीमधून समुद्रात वाहून जाणाऱ्या 65 टीएमसी पाण्याचा आम्ही विचार केला आहे. त्यावर आम्ही काल चर्चा केली. कोकणात असलेला बॅकलॉक काढण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. आमचे रामदास कदम मंत्री होते तेव्हापासून ते प्रयत्नशील होते. छोटे-मोठे, मध्यम बंधारे बांधून कोकणाला समृ्ध करण्याचे काम करण्यात येत आहे. मराठवाडा वाटर ग्रीड महाविकास आघाडीने बासनात गुंडाळला. तो आम्ही सुरू केला. सरकार शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देत आहे. हे कोणत्या राज्याने दिले ते सांगा. त्यामुळे 2 कोटी 80 लाख एकर जमीन संरक्षित होतेय. नुकसान झालेल्या 64 लाख 21 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 49 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. त्यापैकी 55 लाख 21 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2641 कोटी थेट जमा झाले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याशिवाय, हेक्टरी 40 हजार रुपये मदत देण्याचा आमच्या सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. 1600 कोटी रुपये बोनस प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दिले आहेत. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेते 5190 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. या योजनेते 99.5 टक्के काम पूर्ण झाले. राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्याला प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये काल, परवा गारपीट झाली. त्यामुळे पीके बाधित झाली. त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्यांना सरकारच्या सुधारित निकषांप्रमाणे भरपाई दिली जाईल. महाराष्ट्रात कमी पाऊस झाला याची जाणीव आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -