घरBudget 2024Maharashtra Budget Session : 'आपलं महानगर'च्या वृत्ताची दखल, शेतकरी आत्महत्यांवरून पटोलेंनी सरकारला...

Maharashtra Budget Session : ‘आपलं महानगर’च्या वृत्ताची दखल, शेतकरी आत्महत्यांवरून पटोलेंनी सरकारला घेरले

Subscribe

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्यावर ओढावलेल्या अस्मानी संकटाची माहिती देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत ‘आपलं महानगर’मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ दिला. यावेळी पटोले यांनी मराठा समाजातील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याबाबतचे ‘आपलं महानगर’मध्ये आलेले वृत्त वाचून दाखवले.

बुलढाणा जिल्ह्यासह राज्याच्या काही भागांमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. काल सोमवारी (ता. 26 फेब्रुवारी) अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. हाच मुद्दा आज (ता. 27 फेब्रुवारी) विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.(Maharashtra Budget Session: Referring to news of ‘Aapla Mahanagar’, Nana Patole told government about farmer suicides)

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Budget Session : विधानसभेत गोंधळ, जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीची घोषणा

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून (ता. 26 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार हे आज दुपारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. परंतु, दुसरीकडे मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट आणि पावसाचा फटका बसला. या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात आला आहे. शेतकऱ्यांवर अचानक ओढावलेल्या या संकटाचा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली आहे, त्या आत्महत्या तातडीने थांबवल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रात मराठा वि. ओबीसी असा एक नवीन उपक्रम करण्यात आला होता, असे सांगत नाना पटोले यांनी आजच्या ‘आपलं महानगर’मध्ये आलेल्या वृत्ताचा संदर्भ देत मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची माहिती दिली. 2013 ते 2018 मध्ये मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या 24 टक्के होत्या. तर आता 2019 ते 2024 या काळात त्या आत्महत्या 94 टक्क्यांवर गेल्या आहेत. मराठ्यांच्या हिताचा हा कायदा करण्यात आला आहे, पण त्याचे पुढे काय होईल हे माहीत नाही. पण यामध्ये केवळ मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा देण्यात आला आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी ‘आपलं महानगर’मध्ये आलेल्या बातमीचा विधानसभेत संदर्भ दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -