राज्यात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन? वाचा काय आहे अहवाल!

अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा या सिरो सर्व्हेत समावेश होता.

corona mask

देशात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर झालं नाही हे तपासण्यासाठी सिरो सर्व्हे केला जात आहे. त्याप्रमाणे देशात कोरोना ज्या राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रसरत आहे अशा ८३ जिल्ह्यांमध्ये सिरो सर्व्हे करण्यात आला. यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सिरो सर्व्हेचा अहवाल सरकारने जारी केला आहे.

अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा या सिरो सर्व्हेत समावेश होता. त्यामध्ये २३८५ नमुन्यांपैकी फक्त २७ नमुने पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आले. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली नाही, असं राज्य सरकारने सांगितलं. दरम्यान आयसीएमआरनेदेखील भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही, असं स्पष्ट केलं आहे.

ब्लड सीरम टेस्ट

एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडी़ज तपासण्यासाठी ब्लड सीरम टेस्ट केली जाते. सिरो सर्व्हे अंतर्गत हीच टेस्ट करण्यात आली. ज्यामुळे किती लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार झाल्यात आणि कोरोनाव्हायरसचं संक्रमण किती प्रमाणात झालं आहे, याची माहिती मिळण्यास मदत झाली.

राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन?

सिरो सर्व्हे रिपोर्टनुसार राज्यात अद्याप तरी कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. असे असले तरी राज्यात दिवसभरात अडीच हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल २७८६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ११०७४ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४१२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला  आहे. दिलासादायक म्हणजे राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा पहिल्यांदाच वाढली आहे.


हे ही वाचा – पती- पत्नीचं झालं भांडणं, रागाच्या भरात तीने डोक्यात हतोडा घातला आणि…