घरताज्या घडामोडीपती- पत्नीचं झालं भांडणं, रागाच्या भरात तीने डोक्यात हतोडा घातला आणि...

पती- पत्नीचं झालं भांडणं, रागाच्या भरात तीने डोक्यात हतोडा घातला आणि…

Subscribe

संजय आणि पत्नी संगीता यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात  एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने घरगुती वादातून पतीचा डोक्यात हातोडा घालून खून केला आहे. मुलगा रोहित घेवदे याने आई विरूद्ध कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. संजय तुकाराम घेवदे (वय ५२) असं मृत पतीचे नाव आहे. घरगुती वादातून खून केल्याची कबुली पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात दिली आहे. पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील सत्यवती कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.

मृत संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी आणि वारणा कामगार सोसायटीचे संचालक होते. संजय आणि पत्नी संगीता यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यामध्ये संजय हे खाली पडले. त्यावेळी पत्नी संगीता हिने घरातील लोखंडी हातोडा त्यांच्या डोक्यात घातला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

संजय यांच्या मुलाने नंतर लगेचच पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या घटनेची फिर्याद नोंदवल्यावर घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेंद्र पाटील यांनी भेट देवून संजय यांना कोडोली येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाने आपल्या आईविरोधात पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. संजय यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.


हे ही वाचा – Video : मराठी अभिनेत्रींमध्ये रंगली ‘डान्स अंताक्षरी’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -