घरदेश-विदेशLive Update : मध्य रेल्वेची वाहतूक 40 मिनिटे उशिराने

Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक 40 मिनिटे उशिराने

Subscribe

मध्य रेल्वेची वाहतूक 40 मिनिटे उशिराने

ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

- Advertisement -

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांची नियुक्ती

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची नियुक्ती.

- Advertisement -

भारताचा 75 वा प्रजासत्ताक राज्यात एकाच वेळी होणार

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.15 वाजता होणार आहे.


निवडणूक आयोगाच्या व्हायरल पत्रावर दिल्ली निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

16 एप्रिल 2024 ही तारीख निवडणूक योजनाच्या तयारीची असल्याचे निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयाने स्पष्ट केले


रमाकांत आचरेकर यांचे स्मृती स्मारक शिवाजी पार्क मैदानात उभारणार

दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानाच्या गेट नंबर 5 जवळ सुशोभीकरणाचा भाग म्हणून उभारण्यात येणार

क्रिकेटप्रेमी आणि स्थानिक नागरिक स्वखर्चातून हे स्मारक उभे करणार अशी माहिती समोर येत आहे


बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय


लोकसभा निवडणुका 16 एप्रिलला अपेक्षित


राक्षसांचा वध करण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

शिवसेनेने काय केलं होते ते शेंबड्या लोकांना माहित नाही

शंभर दिवस शेळी होऊन दिवस बघण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून बघा

काश्मिरमधून 370 कलम हटवण्यात आम्ही शिवसेना म्हणून भाजपाला मदत केली


ठाकरे कुटुंबाकडून आई भवानीची आरती


मोदी शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना घाबरतात – संजय राऊत

80 कोटी जनता उपाशी असताना मोदींकडून उपवासाचे नाटक

अडीच वर्ष मंत्री म्हणून जे खोके जमा केले ते परत करा


उत्तरेश्वराच्या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे दरे गावात दाखल

पुढील 2 दिवस शिंदे दरे गावात राहणार


मीरा रोड परिसरात बेकायदेशीर बांधकामावर पालिकेचा बुलडोजर

खबरदारी म्हणून परिसरात 1000 पोलीस तैनात


मानहानी खटल्यात राहुल गांधींना दिलासा कायम, 26 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी स्थगित

चौकीदार चोर है असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केल्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल झाली होती.


तलाठी भरतीविरोधात काँग्रेसचं रेल्वे रोको आंदोलन

पश्चिम रेल्वे रुळावर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत असून

अनेक रेल्वे गाड्या दादर स्टेशनवरच खोळंबल्या


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन

शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण


किशोरी पेडणेकरांना 14 फेब्रुवारीपर्यंत कोर्टाचा दिलासा

जामीन अर्जावर 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी


मुंबईत पीठासीन अधिकारी परिषदेचं आयोजन

परिषदेच्या आयोजनाबाबत विधान भवनात बैठक


मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल

मुंबईच्या दिशेने येणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधव पुण्यात दाखल झाले आहे.


मीरा रोडनंतर सोलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये दान गटात राडा


थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात

नाशिकमधील अधिवेशनाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती

सायंकाळी सहा वाजता कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा


बिल्कीस बानोच्या 11 दोषींच आत्मसमर्पण

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेची माफी रद्द केल्यानंतर आत्मसमर्पण


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची आज ईडी चौकशी

फाइव्ह स्टार हॉटेल घोटाळा प्रकरण


रत्नागिरी – कोकण रेल्वेवर आज ब्लॉक तीन रेल्वेगाड्यावर वर होणार परिणाम

कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकादरम्यान पायाभूत कामासाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी

आज मंगळवारी मेगाब्लॉक घेतला जाईल

दुपारी १.१० ते दुपारी ३.४० असा २.३० तासांचा मेगाब्लॉक असेल

यावेळी कोकण रेल्वेवरील तीन रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल

त्यामुळे प्रवाशांचा जादा वेळ प्रवासातच जाणार आहे.

गाडी क्रमांक १६३४५ एलटीटीवरून सुटणारी तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस कोलाड-वीर विभागादरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येईल

गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोडवरून सुटणारी दिवा एक्स्प्रेस रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान एक तास थांबवण्यात येईल

गाडी क्रमांक ०२१९७ कोईम्बतूर जं. जबलपूर एक्सप्रेस मंगळवारी रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल


हुथी बंडखोरांवर एअर स्ट्राईक

अमेरिका आणि ब्रिटनने लाल समुद्रात पुन्हा एकदा हुथी बंडखोरांवर कारवाई केली आहे

दोन्ही देशांनी येमेनमधील हुथींच्या तळांवर संयुक्त हवाई हल्ले केले आहेत

सोमवारी आठ तळांवर हल्ले करण्यात आले यामध्ये, अंडरग्राउंड स्टोरेज साइट आणि हुथींची मिसाइलवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीवर परिणाम करण्यात आला


आमदार रोहित पवार यांची उद्या (बुधवारी) ईडी चौकशी

रोहित पवार यांच्या चौकशीवेळी शरद पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात असणार

ईडी कार्यालय आणि एनसीपीचं कार्यालय एकमेकाजवळ


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी

सुनावणीसाठी दहा दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता

दोन्ही गटाच्या प्रतोदांची उलट तपासणी


पुण्यात आज काँग्रेसची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता


राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं आजपासून सर्वेक्षण

घरोघरी जाऊन केलं जाणार सर्वेक्षण

23 ते 31 जानेवारी दरम्यान राज्यभर केलं जाणार सर्वेक्षण


अयोध्येतील राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं

सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत

रामलल्लाचं दर्शन घेता येणार


शिवसेना ठाकरे गटाचे नाशिमध्ये आज राज्यव्यापी अधिवेशन

ठाकरे गटाचे आज नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन सुरू

सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची सभा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -