घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनि ॥
तर मग देह राहो अथवा जावो आम्ही केवळ ब्रह्मच आहो, असे ज्ञानी समजतात, कारण, दोरीवरील सापाचा भास जसा तिचे सत्यत्व भासल्यावर तिच्या ज्ञानासह व्यर्थ होतो.
मज तरंगपण असे की नसे । ऐसें हे उदकासी कहीं प्रतिभासे? । तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥
आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात, याचा पाण्याला कधी भास होतो काय? कारण, ते केव्हाही पाहिले तरी पाणीच्या पाणीच कायम असते.
तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तू जाहले ॥
ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही किंवा लाटा नाहीशा झाल्यावर ते नाश पावत नाही. त्याप्रमाणे, देहात राहून जे देहासुद्धा ब्रह्म झाले.
आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें नाहीं । तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥
ते देहासकट ब्रह्म झाल्यावर त्याच्या ठिकाणी देहाचे आडनावसुद्धा राहत नाही, मग असे पहा की, कोणत्या वेळेस कशाचा लय होतो?
मग मार्गातें कासया शोधावें? । कोणें कोठूनि कें जावें? । जरी देशकालादि आघवें । आपणचि असे ॥
जर देश काल इत्यादी गोष्टी आपणच होऊन राहिला आहे, तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा व कोठून कसे जावे?
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचे आकाश लागे नीट वाटे । वाटा लागे तरि गगना भेटे । एर्‍हवीं चुके? ॥
आणि ज्या वेळेस घट फुटतो, त्या वेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाही तर चुकते की काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -