घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : आंबेडकरांना वेळ देणारे पटोले कोण? संजय शिरसाटांचा सवाल

Maharashtra Politics : आंबेडकरांना वेळ देणारे पटोले कोण? संजय शिरसाटांचा सवाल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत खडेबोल सुनावले आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत खडेबोल सुनावले आहेत. वंचितने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असला तरी काँग्रेसकडून अद्यापही त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच मुद्द्यारून शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी काँग्रेसवर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics Sanjay Shirsat angry question after Nana Patole gave time to Prakash Ambedkar)

काँग्रेसकडून वंचितला देण्यात येणाऱ्या ऑफरबाबत बोलताना शिवसेनेचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचितला वेळ देणारे नाना पटोले कोण? नाना पटोले यांचे स्वतःचे अस्तित्व कमी होतं चालले आहे. त्यांनाच पक्षामध्ये किती स्थान आहे, हे पाहायला हवे. तीन वाजेपर्यंत निर्णय घ्या वेळ देतो, असे चालत नाही. तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहात. पण आता आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे त्यांचे काय होते, ते पाहू. आघाडी आता टिकणार नाही, हे मी पूर्वीपासून सांगतोय आणि याचा प्रत्यय तुम्हाला पुढच्या एक-दोन दिवसात येईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Eknath Khadse : भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय का? एकनाथ खडसेंनी सांगितले कारण

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली आहे. संजय राऊत हे आधी मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. नंतर ते सिल्व्हर ओकमध्ये गेले. आता ते काँग्रेसच्या किचन कॅबिनेटमध्ये आहेत. लवकरच ते जेलमध्ये जातील. संजय राऊतांवर सगळे टीका करत आहेत. नाना पटोले असो किंवा विश्वजीत कदम असो, सर्व त्यांच्यावर टीका करत आहेत. तुम्ही पक्ष सांभाळू शकत नाही. आघाडी ठेऊ नये काँग्रेससोबत राहू नये यासाठी, संजय राऊत काम करत आहेत, असा आरोपच यावेळी शिरसाट यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या टीकेला संजय राऊत किंवा नाना पटोले नेमके काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावेळी महायुतीतील जागा वाटपाच्या तिढ्याबाबत देखील माहिती दिली आहे. नाशिक ही शिवसेनेची जागा असून खासदार हेमंत गोडसे यांनी आज जरी उमेदवारी अर्ज दाखल केला तरी त्यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग या जागांवर शिवसेना आग्रही असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. तसेच, शनिवारी कल्याण आणि भिवंडी मतदारसंघाबाबत चर्चा झाली वाद संपुष्टात आला आहे. वर्षावर को‌अर कमिटी बैठक झाली, अशी माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा…Lok Sabha 2024 : रामटेक, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ महायुती मोठ्या फरकाने जिंकेल – एकनाथ शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -