घरमनोरंजन​69 वर्षीय रेखाच्या सौंदर्य आणि फिटनेसचे हे आहे सिक्रेट

​69 वर्षीय रेखाच्या सौंदर्य आणि फिटनेसचे हे आहे सिक्रेट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री रेखा तिच्या सौंदर्य आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. रेखा चित्रपटांमध्ये कमी दिसली असली तरी पुरस्कार आणि अनेक कार्यक्रमांमध्ये ती दिसते. सुंदर दिसण्यासोबतच फिटनेसच्या बाबतीत रेखा आजही भल्याभल्यांवर भारी पडते. आज आपण 69 वर्षांच्या रेखाच्या त्या गोष्टींची रहस्य जाणून घेणार आहोत जी 30 वर्षांच्या मुलींनाही लाजवतील. मात्र रेखाचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. जाणून घेऊया काय आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य.

रेखाचे डाएट आणि फिटनेस

रेखा सौंदर्य टिकवून ठेवण्याचे पूर्ण श्रेय पाण्याला देते. ती रोज किमान 10-12 ग्लास पाणी पिते. तिचा असा विश्वास आहे की त्वचेला हायड्रेट ठेवण्यासोबतच ते शरीरातील विषारी घटक देखील काढून टाकते. फास्ट फूड, जंक फूड, तळलेले आणि मसालेदार खाणे रेखा टाळते. यासोबतच रेखा हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाते. यासोबतच जेवणात ती दह्याच्या समावेश करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेखा संध्याकाळी 7 ते 7.30 दरम्यान जेवते आणि त्यानंतर ती काहीही खात नाही. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोप घेणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी उत्तम ठरते.

- Advertisement -

रेखाचे व्यायाम

रेखा सांगते की, वय कितीही असो, शरीराची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. रेखा कितीही व्यस्त असली तरी ती योगा आणि ध्यान करायला विसरत नाही. रेखाच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या सौंदर्याने आणि मेकअपने सर्वांचे मन जिंकते. जुन्या दशकाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री मॅट मेकअप वापरत होती. तर रेखा एक अशी अभिनेत्री बनली जिने ग्लॉसी मेकअप वापरून इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली. यासोबतच,रेखा चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान स्वतः मेकअप करायची.

रेखाच्या केसांचं रहस्य

रेखाचे केस आजही तितकेच सुंदर, काळेभोर, कुरळे आणि लांबसडक आहेत. केसांची काळजी घेण्यासाठी रेखा बेसनचा वापर करते, असे एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने सांगण्यात आले आहे. यासाठी बेसनमध्ये दही मिक्स करून हेअरमास्क तयार करण्यात येतो आणि रेखा आठवड्यातून कमीत कमी 4 वेळा केसांना हा हेअरमास्क लावते असं तिने सांगितलं होतं. याशिवाय ती हेअर ड्रायर, कर्लर, स्ट्रेटनर आणि कृत्रिम केसांची उत्पादने वापरणे टाळते.

- Advertisement -

फिगरचे गुपित

खरं तर रेखा नेहमीच साडीमध्ये दिसते. पण या वयातही रेखाची फिगर परफेक्ट आहे. आजकालच्या मुलींना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूपच कसरत करावी लागते. रेखा नियमित स्वरूपात योगा, व्यायाम, कार्डिओ व्यायाम, ध्यानधारणा करते, ज्यामुळे शरीराचा फिटनेस चांगला राखण्यास मदत मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -