घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक पोहोचले पंढरपुरात, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक पोहोचले पंढरपुरात, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं

Subscribe

आषाढी एकादशी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवण्यात अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं आहे.

पंढरपूर : आषाढी एकादशी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवण्यात अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल रविवारी (ता. 25 जून) अचानकपणे पंढरपुरात हजेरी लावली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पंढरपुरात आल्याने सर्व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. (CM Eknath Shinde suddenly arrived in Pandpur, rebuked the Collector and senior officials)

हेही वाचा – इतका निर्लज्जपणा पाहिला नाही

- Advertisement -

पंढरपुरकडे येणाऱ्या रस्त्यांवर कुठेच खड्डे दिसलेही नाही पाहीजेत आणि पावसात रस्त्यात खड्डे पडलेही नाही पाहीजेत…सर्व रस्ते एक समांतर पातळीवर करा… रस्त्यात कुठे ही कमी जास्त किंवा वर खाली स्तर नको. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहीजे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी वारीची संदर्भात पंढरपूर शहराचा आणि आजूबाजूच्या परिसरातील पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी कामात ज्या त्रूटी आढळून आल्या त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ जागेवरच सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेचे खडसावलेले पाहायला मिळाले. वारकरी पंढरपूरात दाखल होण्याआधी सर्व कामे युद्ध पातळीवर रात्र दिवस काम करून पुर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर विकास कामांना कोणताही नीधी लागला तर मी विशेष नीधीची तत्काळ व्यवस्था करतो. पण कामे तत्काळ वेगाने पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री हे उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जे अधिकारी यावेळी अनुपस्थितीत होते, त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संवाद साधला आणि वारकऱ्यांच्या सोयींमध्ये कोणतीही हयगय झाली नाही पाहिजे, असे सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पंढरपूर येथे हजेरी लावल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांचा हा दौरा तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांना धोबीपछाड करण्यासाठी असल्याचे देखील बोलले जात आहे. कारण उद्या मंगळवारी 27 तारखेला तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर हे पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्याकरिता दाखल होणार आहेत. मात्र त्या आधीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हजेरी लावून केसीआर यांचे गणित बिघडवल्याचे बोलले जात आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -