घरमहाराष्ट्रपुणेओबीसी नेत्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाले...

ओबीसी नेत्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाले…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेत्यांना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं पण त्यांना कोणत्याही पदावर संधी दिली जात नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेत्यांना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं पण त्यांना कोणत्याही पदावर संधी दिली जात नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस हे त्यांच्या अज्ञानापोटी असे वक्तव्य करत असतात, त्यामुळे त्यांना फारसे मनावर घेण्याची गरज नाही, असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय विषयांसहित पाटण्यातील बैठकीवर सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला देखील उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी आज (ता. 26 जून) बारामतीतून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar criticized Fadnavis on the issue of OBC leaders)

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक पोहोचले पंढपुरात, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस हे अज्ञानापोटी वक्तव्य करत असतात. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष हे छगन भुजबळ होते. ते कोण आहेत. त्यानंतर मधुकर पिचड हे अध्यक्ष होते. त्यानंतर तटकरे.. एक एक नावांची जर का यादी काढली तर असे सांगताना शरद पवार म्हणाले की, फडणवीसांचे वाचन किती आहे हे माहीत नाही. पण जर का त्यांनी माहिती घेऊन वक्तव्ये केली तर बरं आहे. पण लोकांना सगळं माहीत आहे. पण मुळात त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवतेला धरून उपस्थित केलेला प्रश्न नाही, हे लोकांना माहीत असल्याचेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

एकनाथ शिंदेंनी केली तर बेईमानी पवार साहेबांनी केली तर ती मुत्सद्देगिरी असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगाव. 1977 साली जेव्हा आम्ही सरकार बनवलं तेव्हा भाजप माझ्यासोबत होता. फडणवीस हे त्यावेळी लहान होते. त्यामुळे त्यांना याबाबत माहिती नसेल. फडणवीसांना तेव्हाचा इतिहास माहीत नव्हता. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना घेऊन केलं. त्या सरकारमध्ये त्यावेळचा जनसंघातील उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. आणखी काही सदस्य होते. पण त्यावेळी फडणवीस हे कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्या काळातील फारशी काही माहिती नसेल. त्यांच्या अज्ञानापोटी ते असे वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांबद्दल फारसे भाष्य करण्याची गरज नाही, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला आहे.

- Advertisement -

तसेच, अजित पवारांनी विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा राजीनामा देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार किंवा कोणत्याही व्यक्तीच्याबद्दल निर्णय कोणी एक घेत नाही. त्यांच्यासह पक्षातील इतर व्यक्ती सामंजस्याने निर्णय घेतील. संघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावे, अशी भावना आहे. तेच मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे, असेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -