घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड-रोहित पवारांच्या प्रश्नावर Ajit Pawar म्हणाले; "खपल्या काढायच्या नाही"

जितेंद्र आव्हाड-रोहित पवारांच्या प्रश्नावर Ajit Pawar म्हणाले; “खपल्या काढायच्या नाही”

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावे, हा त्यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे 8 महिने असल्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या व्यक्तव्यावर दिली आहे.

पुणे : ‘नो ‘कमेंट्स, कशाकरता खपल्या उकरून काढायच्या’, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांच्या प्रश्नारवर दिली आहे. मी कामाचा माणूस आहे, मला फालतू मुद्यांवर बोलायचे नाही, असेही अजित पवार म्हणाले. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवर टीका करणे अजित पवारांनी टाळले असून या दोघांसंदर्भात प्रश्न विचारला म्हणून त्यांनी पत्रकारांनाही फटकारले.

रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली? यावर अजित पवार म्हणाले, “मला त्याबद्दल काही बोलायचे नाही. नो कमेंट्स, कशा करता खपल्या उकरून काढायचे काम करत आहात. मी कामाचा माणूस आहे, अशी आलतूफालतू उत्तर देणारा माणूस नाही”,  असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे 8 महिने आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावे, हा त्यांचा अधिकार आहे. तुमच्या पोटात का दुखते? ते आज राज्याचे प्रमुख आहे. राज्याचे प्रमुख राहण्याकरिता जे बहुमत असाला पाहिजे ते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना संबोधित त्यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Adani : सत्य जिंकले की सत्यालाही…, ठाकरे गटाचा भाजपावर घणाघात

सर्वसामान्यांचा पैसे कसा खर्च करायचा आम्हाला माहिती

शिंदे समितीला बाहेरचे दौरे आणि प्रवासासाठी 4 लाख रुपये देण्याचा ठरवले आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुम्हाला काय त्रास होत का? असा उलट सवाल अजित पवारांनी पत्रकाराला विचारले. सर्वसामान्यांचा पैसे कसा खर्च करायचा याचे आम्हाला चांगले माहिती आहे. आम्ही हे आजच करत नाही. एखाद्या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेतल्यानंतर कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याचे आणि त्यातून राज्याचे हित आणि कायदा सुव्यवस्था कशी संभाळावी. हा निर्णय लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार घेऊ शकते.”

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -