घरमहाराष्ट्रपुणेED Raids Baramati Agro : रोहित पवारांच्या Baramati Agroसह सहा ठिकाणी ईडीचे...

ED Raids Baramati Agro : रोहित पवारांच्या Baramati Agroसह सहा ठिकाणी ईडीचे छापे

Subscribe

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि सत्तेत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे असलेले आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील बारामती Agro या कंपनीवर आज पाच जानेवारी ईडीने छापेमारी सुरू केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या बारामती Agro या कंपनीसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली असून, अजून काही ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती आहे. ही छापेमारी आज 5 जानेवारी रोजी सकाळी करण्यात आली असून, गेल्या दोन तासांपासून ईडीचे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. (ED Raids Baramati Agro ED raids at six places including Rohit Pawars Baramati Agro)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि सत्तेत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे असलेले आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील बारामती Agro या कंपनीवर आज पाच जानेवारी ईडीने छापेमारी सुरू केली आहे.

- Advertisement -

ईडीने शुक्रवारी कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती Agroच्या आवारात आणि संबंधित संस्थांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. ही छापेमारी बारामती, पुणे, औरंगाबाद आणि अमरावती येथील सहा ठिकाणी करण्यात आली असून, येथे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.

 

- Advertisement -

हा होता गुन्हे शाखेला संशय

राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु केल्यानंतर आजची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाकडे परवावनगी मागितली होती. अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.

हेही वाचा : Electricity : भारतीयांच्या घरातील विजेच्या ‘दिव्यांना’ नेपाळची साथ; पुढील दहा वर्षे…

नेमकं प्रकरण काय?

Baramati Agro लिमिटेड हा एक उद्योग आहे. रोहित पवार Baramati Agro कंपनीचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. पशू खाद्य हे Baramati Agroचं मुख्य प्रोडक्ट असून कंपनीचे साखर उत्पादन सुरू केलं. कंपनीचे बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही Baramati Agroद्वारे केले जातात. पण या कंपनीच्या दोन प्लांट बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रक बोर्डाने आदेश दिले होते. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी रोहित पवारांना ईडीने नोटीसही बजावली होती.

हेही वाचा : CM Eknath Shinde यांनी मलंगगडाबाबत केलेल्या वक्तव्यावरून Asaduddin Owaisi आक्रमक, म्हणाले…

24 तासांत मिळाला होता रोहित पवारांना दिलासा

रोहित पवार यांच्या Baramati Agro कंपनीला 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2 वाजता नोटीस पाठवण्यात आली होती. Baramati Agro कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोहित पवारांना 72 तासांचा वेळ दिला होता. दरम्यान हायकोर्टानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला 6 ऑक्टोबरपर्यंत रोहित पवार यांच्या Baramati Agro कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -