घरमहाराष्ट्रखोके सरकार, ओके सरकार; विरोधकांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

खोके सरकार, ओके सरकार; विरोधकांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

Subscribe

नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पावसाळी अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी 50 खोके एकदम ओके, खोके सरकार, ओके सरकार अशा घोषणाबाजी देत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर बॅनर आणि फलक घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

कर्नाटक सरकार हाय, हाय, ईडी सरकार हाय, हाय… अरे खोटरड्या बोम्मईंचा धिक्कार असो…विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… तांदळाला अनुदान मिळाचं पाहिजे… अरे देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही…शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत  अमहाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

- Advertisement -

आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह  धनंजय मुंडे आक्रमकपणे घोषण देत होते. यावेळी जयंत पाटील, आदित्य ठाकरे सुद्धा सामील झाले होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -