घरमहाराष्ट्रITI विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन 500 रुपयांपर्यंत वाढणार; मंगलप्रभात लोढांचे आश्वासन

ITI विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन 500 रुपयांपर्यंत वाढणार; मंगलप्रभात लोढांचे आश्वासन

Subscribe

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन 40 रुपयांवरून आता 500 रुपये करण्यात येणार आहे, तसेच येत्या तीन महिन्यात हा विद्यावेतन लागू करण्यात येईल असे आश्वासन आज राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी ITI मध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना 1986 पासून विद्यावेतन म्हणून मासिक 40 रुपये देण्यात येत आहेत. मात्र वाढ होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत आज सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ज्यावर उत्तर देताना मंत्री लोढी बोलत होते. यावेळी त्यांनी आयटीआयमध्ये नवीन कोर्स समाविष्य करण्याबाबत पुढील वर्षी घोषणा करू अशी घोषणाही केली आहे.

- Advertisement -

खासगी आयआयटी कॉलेजच्या तुलनेत शासकीय आयआयटीचे प्रवेश शुल्क कमी आहे. यात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकट करुन 100 टक्के प्रवेश होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. जिल्हा आणि तालुक्याच्या मागणीनुसार, एमआयडीसी आणि उद्योगपुरक अभ्यासक्रम सुरु करण्याची कार्यवाही सुरु असून स्थानिक कुशल कामगार आणि आयआयटीमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासनही मंत्री लोढा यांनी विधानपरिषदेत दिले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सध्या 418 शासकीय आयटीआय प्रशिक्षण संस्था आहेत. ज्यात सर्वसाधारण कुटुंबातीव विद्यार्थी शिक्षण प्रशिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आयटीआय संस्थांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लास रुम, ग्रंथालय, जीम अशा विविध सुविधा देण्यात येईल, ज्याची अंमलबजावणी पुढील 6 महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी माहितीही मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

- Advertisement -

आयटीआय संस्थांसंदर्भात राज्यातील 26 जिल्ह्यांसाठी एका कमिटीची स्थापना करून त्या जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत. तिथे आवश्यक असणारे स्किलसाठीचे कोर्स घेतले जातील आणि त्यारितीने मुलांना प्रशिक्षण दिले जाईल, असही मंत्री लोढा म्हणाले. विधान परिषदेत विक्रम काळे, सुधीर तांबे, सतिश चव्हाण आणि बाळाराम पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री लोढा यांनी उत्तर दिले.


सीमावादावरून गदारोळ, विरोधकांच्या ‘त्या’ आग्रही मागणीला उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -