घरताज्या घडामोडीCabinet Decisions राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

Cabinet Decisions राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीपर्वी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे. या मागणीचा विचार करत, महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज (गुरुवार) घेतला आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. या योजनेचा फायदा साडेचार ते पाच हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

- Advertisement -

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

– शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू होणार. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होणार. (वित्त विभाग)
– अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सेतूसाठी पथकर 250 रुपये निश्चित. (नगरविकास विभाग)
– दूध उत्पादकांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान. (दुग्धविकास विभाग)
– विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार. (जलसंपदा विभाग)

– मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता. ( वित्त विभाग)

- Advertisement -

– पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान. 400 उद्योगांना फायदा ( वस्त्रोद्योग)

– रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ. (वस्त्रोद्योग विभाग)

– द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार. ( उद्योग विभाग)

– नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता. ( परिवहन विभाग)

– सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला. ( सहकार विभाग)

आश्वासन पूर्ण करणार – गिरीश महाजन

जुनी पेन्शन सरसकट लागू करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आमचे अधिकारी काम करत आहेत. आमच्या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहाणा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -