घरताज्या घडामोडीकचऱ्यातूनच ऊर्जानिर्मिती होते, शिंदे गटात प्रवेशानंतर कायंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

कचऱ्यातूनच ऊर्जानिर्मिती होते, शिंदे गटात प्रवेशानंतर कायंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या मनीषा कायंदे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आपली भूमिका मांडत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊतांवर पलटवार केला आहे. सकाळी उठून काहीतरी बोलणाऱ्यांपेक्षा काम करायचे आहे. कचऱ्यातूनच ऊर्जा निर्मिती करण्यात येते असे प्रत्युत्तर मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कचरा निघून जातोय अशी टीका माजी पर्यावरणमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मनीषा कायंदेंवर केली होती. याला मनीषा कायंदेंनी प्रथम प्रत्युत्तर दिलं आहे. “तिकडे आसल्यावर मी चांगली, इकडे आल्यावर मी वाईट, कोणी म्हणाले कचरा निघून जात आहे. माजी पर्यावरण मंत्र्यांना मी सांगू इच्छिते की कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती होते. पण आता ही ऊर्जा निर्मिती कशी होते हे बघा अशा शब्दात आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.

- Advertisement -

थूकरटवाडी म्हणत राऊतांवर निशाणा

मनीषा कायंदेंनी शिंदेंच धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ सकाळी उठून थुकरटवाडी बघण्यासाठी लोकं TV बघत नाही. सकाळी उठून आमच्या देव देवतांचे अपमान करणारे, देवी बसली म्हणून खिल्ली उडवणारे असे लोकं हिंदुत्वाचा आणि शिवसेनाचा चेहरा कसा, बाळासाहेबांची ही शिवसेना आहे का? मला काम करायचे आहे केवळ सकाळी उठून काहीतरी बोलायचे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा आवाज बनायचे. मला काम करायचे आहे. कोणीतरी म्हणाले की, १ वर्षाने टर्म संपणार आहे. शिवसैनिक म्हणून कधीही टर्म संपत नाही असे म्हणत कायंदेंनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.

म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मनीषा कायंदे यांनी एक वर्षानंतर शिंदे गटात प्रवेश करण्याचे कारण सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, मला नेहमीच एकनाथ शिंदे यांची साथ लाभली आहे. हा बदल का झाला आताच का झाला. एक वर्ष हे सरकार पूर्ण करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. तुम्ही पाहिला असाल जो कामाचा झपाटा आहे. गतिमान सरकार लोकांनी खूप नावे ठेवली, उपाधी जोडल्या पण शिंदेंनी त्यांच्या कामातून उत्तर दिलं आहे. कधीही वेडावाकडा शब्द काढला नाही.

- Advertisement -

महाराष्ट्रातील कामेही झपाट्याने सुरु आहेत. मेट्रो, प्रोजेक्ट असतील अनेक महिने ज्यांचे कामं थांबली होती. समृद्धी महामार्ग झाला त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलं. संभाजीनगरचे नामांतर करण्यात आले. पण एक वर्षात उद्धव ठाकरेंनी पक्षपुनर्बांधणी करताना केवळ दोषारोप करणं आत्मपरिक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चाललेत, यापुढे सुद्धा लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असा विश्वास मनीषा कायंदेंनी व्यक्त केला आहे.

मला अत्यंत आनंद होत आहे. माझ्यासाठी हा मान सन्मानाचा दिवस आहे. जी अधिकृत शिवसेना आहे. त्यात मी आहे आणि पुढे काम करत राहील. २०१२ साली मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवक्ता झाले आणि विधान परिषदेत संधी मिळाली. मी कधीही पक्षाविरोधात काम केले नाही. माझ्या पक्षाशी मी प्रामाणिकपणे काम केले आहे. जे काही सभागृहाच्या आत आणि बाहेर असेल तिकडे पक्षाची भूमिका भक्कम मांडली आहे.

ठाकरेंनी आत्मपरीक्षण कधीही केलं नाही

पक्षप्रवेशानंतर मनीषा कायंदेंनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही घरचा आहेर दिला आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी महाविकास आघाडी झाली तेव्हा जुन्या जाणत्या लोकांना ते आवडलं नाही. पण पक्षप्रमुख बोलल्यामुळे सरकार स्थापन झाले. सरकार आल्यावर तसे काम झाले नाही. अनेक अडचणी निर्माण झाल्या. जे बोलायचे होते ते बोलू शकले नाहीत. पक्षात काही चुकीचे चालले आहे. कोणी महिला कार्यकर्त्याकडून पैसे उकळते आहे. हे जर असेल तर ती बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे त्यामुळे इथे आली आहे. एक वर्षात उद्धव ठाकरेंनी पक्षपुनर्बांधणी करताना केवळ दोषारोप केले. आत्मपरिक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चाललेत, यापुढे सुद्धा लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असे मनीषा कांयंदे म्हणाल्या आहेत.


हेही वाचा : आधी केलेले आरोप जाऊ दे… ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -