घरमहाराष्ट्रManoj Jarange : आंबेडकरांच्या सल्ल्यानंतर मनोज जरांगे यांनी 'लायकी' शब्द घेतला मागे;...

Manoj Jarange : आंबेडकरांच्या सल्ल्यानंतर मनोज जरांगे यांनी ‘लायकी’ शब्द घेतला मागे; भुजबळांवर टीकास्त्र

Subscribe

बीड : गेल्या काही दिवासांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री असलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये वाद वाढला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद सुरू झाला आहे. भुजबळांच्या प्रत्येक वक्तव्याला मनोज जरांगे प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. मनोज जरांगेंनी त्यांच्या एका भाषणावेळी ‘लायकी’ शब्द वापर केला होता. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांना चांगलेच टार्गेट केले होते. मात्र आता त्यांनी लायकी शब्द मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्याने शब्द मागे घेत असल्याचे सांगताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्रही सोडले. (Following Prakash Ambedkars advice Manoj Jarange Patil withdrew the word deserving Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Narayan Rane : मैदानावरून खळ्यात ही यांची अधोगती; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ भाकिताचा राणेंकडून समाचार

- Advertisement -

मनोज जरांगे यांनी त्यांच्या एका भाषणात बोलताना ‘ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, मनोज जरांगे यांनी कोणत्या अर्थाने तो शब्द वापरला ते मला माहिती नाही. पण त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांबद्दलच तो शब्द वापरला असावा. कारण मराठा समाजाचे एवढे नेते मुख्यमंत्री, मंत्री झाले, पण त्यांनी समाजासाठी काहीही केलं नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी आपण ‘लायकी’ हा शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच मराठ्यांना न्याय मिळावा हाच हेतू असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.  त्यांनी म्हटले की, लायकी हा शब्द मागे घेताना तो छगन भुजबळांमुळे नाही तर प्रकाश आंबेडकरांमुळे मागे घेत आहे. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला आपण ऐकला आहे. प्रकाश आंबेडकर हे एका उंचीचे नेते आहेत. त्यांनी जे बोललं ते पटलं आहे. पण भुजबळ हे सवैंधानिक पदावर असले तरीही काहीही बरळतात. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, असा चिमटा काढण्याचा प्रयत्नही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा – CM Eknath Shinde : छगन भुजबळांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

नांदेड जिल्ह्यात मनोज जरांगेंची चार ठिकाणी सभा

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांची 3 डिसेंबरला धुळ्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाकडून तयारीला वेग आला आहे. यानंतर 8 डिसेंबरला मनोज जरांगे यांची नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी सभा होणार आहे. राज्य सरकारकडून मराठा समजाला आरक्षण मिळावे आणि राज्य सरकारवर आरक्षण देण्याचं कायम लक्षात राहावं, या उद्देशाने मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून सभांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -