घरमहाराष्ट्रManoj Jarange : पहाटे तीन वाजता फोन खणखणला आणि...; मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

Manoj Jarange : पहाटे तीन वाजता फोन खणखणला आणि…; मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हे काहीशा प्रमाणात शांत झाले आहे. मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासहित अनेकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणे सोडलेले नाही. फडणवीसांना माझ्यासोबत बोलायचं नव्हतं, पण पहाटे तीन वाजता त्यांनी मला फोन केला होता, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच आदर्श आचारसंहित लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करणार आहे, पण मी शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  (Devendra Fadnavis didnt want to talk to me but called me at three in the morning Manoj Jaranges secret blast)

हेही वाचा – Gautam Singhania : मुलाला संपत्ती देऊन पश्चाताप करणारे विजयपत सिंघानिया घरी परतले

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला जाणीवपूर्वक अडचणींत आणण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ दिले नाहीत. मात्र न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. खरंतर सरकारने ही भूमिका घ्यायला हवी होती, पण तसं झालं नाही. ज्या जनतेच्या जिवावर मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करत आहे. आंदोलन, कार्यक्रम चार महिन्यांपूर्वी झाले, जेसीबी लावले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं सुरू केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली. परंतु मी फुटणार नाही आणि हटणार नाही. कायद्याचं पालन करणार आहे. आदर्श आचारसंहिता आहे तोपर्यंत यांना पुन्हा सुख मिळतंय, पण हरकत नाही. मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या समाजाविषयी द्वेष व्यक्त होतो आहे. त्यामुळे बाकीच्या जाती-धर्माच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर आहे. पोलीस करत आहेत असं सांगितलं जातं आहे. पण गृहमंत्री आमच्या विरोधात आकसाने वागत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : माझी काही इमेज ठेवा; संजय राऊतांबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल भाष्य

गुन्हे मागे घेतो सांगण्यासाठी तीन वाजता फोन केला

गुन्हे मागे घेतो असं सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता फोन केला होता, असा गौप्यस्फोट करत मनोज जरांगे म्हणाले की, त्यांना बोलायचं नव्हतं, पण तरीही ते बोलले. त्यांनी मला आधी एक वाजता आधी फोन केला, पण मी तो घेतला नाही. त्यानंतर मला पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले होते. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही. पण तरीही कारवाया सुरुच आहेत. एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही आणि दुसरीकडून कारवाया सुरुच ठेवायच्या, असंच दिसतं असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -