घरमहाराष्ट्रManoj Jarange : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचे मोठे वक्तव्य; फॉर्म भरणे माझा निर्णय...

Manoj Jarange : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचे मोठे वक्तव्य; फॉर्म भरणे माझा निर्णय नाही, तर…

Subscribe

जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका होताना दिसत आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही, हा समाजाचा निर्णय आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. मनोज जरांगे यांनी भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील सभेत हे वक्तव्य केले. (Manoj Jaranges big statement in the wake of the election It is not my decision to fill the form)

हेही वाचा – MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंचे ‘ते’ आरोप राहुल नार्वेकरांनी खोडून काढले

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचा लढा राजकारण म्हणून बघू नये. आता मराठा समाज एकत्र आला आहे. त्यामुळे एकजूट फुटू द्यायची नाही. सगेसोयऱ्यांबाबत सरकारची काही दिवस वाट बघू. परंतु देवेंद्र फडणवीस यांना वाटते मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. दिलेल्या 10 टक्के आरक्षणामुळे मराठा खुश आहे, असं त्यांना वाटतं. परंतु मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितले आहे. तुम्ही 10 टक्के दिलं म्हणून मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर तुमच्या अंगावरचा गुलाल 15 दिवस निघाला नसता, असं मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या विरोधातील नेत्यांना इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या नादाला लागू नाका, नाहीतर तुमचा टांगा पलटी करू. आरक्षण विरोधात बोलला की टांगा पलटी होणारच मग तो कोण्याही पक्षाचा असो, असे म्हणत मनोज जरांगे यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझी चौकशी लावली आहे. ज्यांची चौकशी लावली आहे ते त्यांच्याकडे जातात. मला 10 टक्के आरक्षण घ्या म्हणतात, पण मी नाही म्हणालो म्हणून माझी एसआयटी चौकशी लावली आहे. माझ्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू , वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आहेत, असे ते म्हणतात. पण माझ्या मागे कुणी नाही. माझ्या मागे फक्त मराठा समाज आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Politics: शरद पवारांनी ‘ती’ ऑफर दिली अन् उद्धव ठाकरेंची नियत फिरली; ‘या’ नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’

फॉर्म भरणे माझा निर्णय नाही तर समाजाचा

मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे ऐकतात आणि आमचा करेकट कार्यक्रम करा असं म्हणतात. पण मर्यादा तोडल्या तर मराठा समाज यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही. ते काही माझे करू शकत नाहीत आणि केलं तर माझ्या घरावर तुळशीपत्र आहे. पण मराठे आता फॉर्म भरत आहेत आणि त्यांची फजिती होणार आहे, त्यांना टेन्शन येणार आहे. पण फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही, तर हा समाजाचा निर्णय आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -