घरमहाराष्ट्रJitendra Awhad : अजित पवारांमुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले, आव्हाडांचा गंभीर...

Jitendra Awhad : अजित पवारांमुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले, आव्हाडांचा गंभीर आरोप

Subscribe

वाटेल ते बोलणे, वाटेल तशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा अपमान करणे, यामुळे अनेक नेते पक्ष सोडून गेले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई : वाटेल ते बोलणे, वाटेल तशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा अपमान करणे, यामुळे अनेक नेते पक्ष सोडून गेले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अजित पवार यांची आज (ता. 16 फेब्रुवारी) बारामतीत सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत सडकून टीका केली आहे. (Many people left NCP because of Ajit Pawar, Jitendra Awhad alleges)

हेही वाचा… Awhad On Ajit Pawar : तेव्हा अजितदादा बाथरुमध्ये लपायचे; आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका

- Advertisement -

अजित पवार यांच्यावर आरोप करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुमचे आणि छगन भुजबळांचे, प्रफुल्ल पटेलांचे किती सुमधूर संबंध होते ते का आम्हाला माहिती नाही? तरीही सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही सगळेजण एकत्र आलात तर रहा सोबत. पण उगीच शरद पवारांना डसण्याचा प्रयत्न करु नका, कारण बात निकलेगी तो दूर तक जायेगी, असा इशाराच आव्हाडांकडून देण्यात आला आहे.

त्याशिवाय, वाटेल ते बोलणे, वाटेल तशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा अपमान करणे यामुळे अनेक नेते पक्ष सोडून गेल. शरद पवार यांचे जितके ज्येष्ठ नेते होते, जे परंपरेने शरद पवार समर्थक होते, त्यांना कायम अपमानित केले जायचे. त्यातील मोठे उदाहरण म्हणजे दत्ता मेघे, असे सांगत आव्हाडांनी पक्षातून ज्येष्ठ नेतेमंडळी बाहेर जाण्यासाठी अजित पवारांना जबाबदार धरले आहे. तर तुम्ही उठता-बसता मला शिव्या देता. परंतु, मी तुमच्यासारख्या चुका केल्या असत्या तर शरद पवारांनी मला केव्हाच पक्षातून हाकलले असते. तुम्ही पक्षात काय-काय कुरघोड्या करत होतात, आमच्याबद्दल शरद पवारांना खोटेनाटे सांगत होतात. कारण तुम्हाला तेवढेच धंदे होते, असा खडेबोलही जितेंद्र आव्हाडांनी सुनावले आहेत.

- Advertisement -

तसेच, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फार लोकप्रिय होत असाल तर दिवसेंदिवस तुमच्या लोकप्रियतेत घट होत आहे. 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला तुम्ही टोचून बोलणार असाल, तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या बापासमोर मानही न उचलणारी पोरं या महाराष्ट्रात आहेत. आजही असे पुतणे आहेत, जे काकासमोर मान वरतीही करत नाही. पण तुम्ही तर तुमच्या काकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले आहात, असा आरोपही जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता आव्हाडांनी केलेल्या या आरोपांना अजित पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेतेमंडळी नेमके काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -