घरमहाराष्ट्रBJP Vs Thackeray Group : नीलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; भाजप- ठाकरे गट...

BJP Vs Thackeray Group : नीलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; भाजप- ठाकरे गट आमनेसामने

Subscribe

कोकणातील राजकारणात आज सर्वात मोठी घटना घडली आहे. कारण, भाजपाचे नीलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली.

गुहागर : राज्यातील राजकारण तापत असतानाच याचदरम्यान आज 16 फेब्रवारी रोजी कोकणातील राजकारण जोरदार तापल्याचे चित्र आहे. कारण, भाजपाचे नेते नीलेश राणे यांचा ताफा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरुन जात असताना राणेंच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत असून, सध्या गुहागरमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. (BJP Vs Thackeray Group Stone pelting on Nilesh Ranes convoy BJP Thackeray group face to face)

कोकणातील राजकारणात आज सर्वात मोठी घटना घडली आहे. कारण, भाजपाचे नीलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून नीलेश राणे यांनी गुहागमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे.

- Advertisement -

या सभेसाठी जात असताना नीलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे माध्यमांसमोर येत त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. तर हा पूर्वनियोजित कट होता अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

हेही वाचा : Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; वाचा सविस्तर

- Advertisement -

भास्कर जाधवांना धमकीचे फोन

कोकणात नारायण राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन दगडफेक करत असल्याचे चित्र आहे. या दोन्ही नेत्यांचा वाद शिगेला पोहचला आहे. या तणावापूर्वी आमदार भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने त्यांच्या कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलीस सतर्क झाले आहेत.

हेही वाचा : Local Megablock : रविवारी घराबाहेर पडणार आहात? त्याआधी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक

तरीही कार्यकर्ते एकमेकांशी भिडले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला होता. याच टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्या जाहीर सभेसाठी तळकोकणासह कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन ते सभास्थळी पोहोचत असतानाच भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलीस संरक्षण वाढवण्यात आलं होतं.. भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात नीलेश राणेंची जाहीर सभा असल्याने पोलीस प्रशासन कामाला लागलं होतं. तरीही दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -