घरमहाराष्ट्रजालन्यातील संघर्षामुळे पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या ST बसेस रद्द; प्रवाशांचे हाल

जालन्यातील संघर्षामुळे पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या ST बसेस रद्द; प्रवाशांचे हाल

Subscribe

मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून औरंगाबाद, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून औरंगाबाद आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि गोळीबारामुळे आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या संघर्षामुळे वातावरण चिघळलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले आहेत. राज्यभरात या संघर्षाचा निषेध करत सर्वच विरोधी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलने करत असल्यानं हा संघर्ष आता टोकाला गेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ एसटी महामंडळाच्या बसेसची जाळपोळ आणि तोडफोड होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून औरंगाबाद, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून औरंगाबाद आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. (Maratha Kranti Morcha ST buses from Pune to Marathwada canceled due to clashes in Jalana )

जिल्ह्यातील सर्वच 11 एसटी डेपोच्या जवळपास 630 बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशी- विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. पोलीस विभागाने बसेस पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून बस सुरू करण्याबाबत सूचना येईपर्यंत नगर जिल्ह्यातील बसेस बंद राहतील, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

जालना येथील घटनेनंतर मराठा आरक्षणाचा अनेक ठिकाणी संतप्त आंदोलकांनी विशेष करून एसटी बसेसना लक्ष केलं असून अनेक बसेस जाळल्या. अनेक बसेसची तोडफोडही करण्यात आली. त्यामुळे सध्यातरी सार्वजनिक सेवा देणारी लालपरीची सेवा संपूर्ण नगर जिल्ह्यात बंद आहे.

सामान्य प्रवाशांना फटका

छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये 600 एसटी बस सोडण्यात येतात. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: पोलिसांची माया वाटणाऱ्या गृहमंत्र्यांनी सत्य परिस्थिती समजून घेऊन वक्तव्य करावे – मनोज जरांगे )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -