Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन पुन्हा एकदा कॉमेडीचा बादशहा नवीन प्रभाकर!

पुन्हा एकदा कॉमेडीचा बादशहा नवीन प्रभाकर!

Subscribe

गणपत पाटील, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, दादा कोंडके अशा विविध कलाकारांचे आवाज मी शिकत गेलो आणि नंतर कळलं की, अरे हे तर प्रोफेशन आहे !...

आजही ‘पैचान कोन…’ असं म्हटलं की, नजरेसमोर कॉमेडीचा बादशहा नवीन प्रभाकर येतो. असा हा ‘पैचान कौन’ या पंचलाईनचा जनक, प्रसिद्ध कॉमेडियन नवीन प्रभाकर मनोरंजनाचं एक नवं पॅकेज घेऊन काही दिवसांपूर्वी रंगमंचावर अवतरला आहे. ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ हे ते नवं कोरं पॅकेज.

गेल्या काही दिवसांत ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ या लाईव्ह कार्यक्रमाचे विविध नाट्यगृहांमध्ये वेगवेगळे आठ प्रयोग पार पडले. या कॉमेडी शो च्या निमित्ताने नवीन प्रभाकर १५ वर्षांनी आपल्या खुमासदार शैलीमधे स्टँडअप कॉमेडीचे सादरीकरण करत आहे. या शोची मूळ संकल्पना नवीनचीच आहे. या नव्या शोबद्दल झालेल्या गप्पांच्या निमित्ताने
नवीन प्रभाकर सांगत होता की, गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये चाहत्यांनी मला जे काही प्रेम दिलं, त्या प्रेमाखातर एक परतफेड म्हणून मी ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ सादर करत आहे. या कार्यक्रमाचे माध्यम हे पूर्णपणे हिंदी आहे. पण स्थल-कालानुरूप कार्यक्रमाला ज्या भाषिक माध्यमाचा प्रेक्षक लाभेल त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याचा एक वेगळा निर्णय घेतला. मराठी प्रेक्षक असेल तर अर्ध्या तासाचे मराठीतून सादरीकरण करतो. गुजराथी असेल तर आम्ही गुजरातीतूनच सादरीकरण करतो. या कार्यक्रमात व्यंगात्मक टिप्पणीही आहे. बॉलिवूड मिमिक्री, डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालू घडामोडींवर विनोदी पद्धतीने भाष्यही केलेले आहे. त्यामुळे माझा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी फक्त हास्याची पर्वणी नसून ताणतणाव दूर करुन मनशांती देणारे अनोखे पॅकेज आहे.”

- Advertisement -

The Great Indian Laughter Challenge - Watch Episode 24 - Encouraging the Finalists on Disney+ Hotstar

या कार्यक्रमानिमित्त नवीन सोबत झालेल्या भेटीमध्ये त्याच्या भूतकाळामध्ये डोकावण्याचा छोटासा प्रयत्न केला. नवीन मूळचा करमाळ्याचा म्हणजे जे नागराज मंजुळेंचेही गाव आहे. घरचा शेतीवाडीचा व्यवसाय आहे. नवीनला त्याचं गावं एवढं आवडतं की, दर दोन महिन्यांनी तो गावाला भेट देतो. नवीनच सारं शिक्षण मुंबईच्या गोरेगाव मध्ये पार पडलं. बालपण एवढं काही हलाखीचं नसलं तरी कुटुंबाचे संघर्षाचे दिवस होतेच. परंतू नवीन सांगतो की, त्याही परिस्थितीमध्ये बालपण माझ्या तीनही भावांसोबत तसं खूप मजेत गेलं. मी जिथे राहायचो तिथे अवतीभोवती सगळंच संमिश्र वातावरण होतं. पंजाबी, सिंधी, मारवाडी, गुजराती अशा कैक भाषांचे लोक शेजारपजारी होते. त्यामुळे माझ्यावर लहानपणापासूनच या सर्व भाषांचा खूप पगडा होता. मी त्या सहज शिकतंही गेलो. आता विविध कॅरेक्टर्स करताना ती भाषा-देहबोली खूप कामाला येते.

- Advertisement -

Navin Prabhakar: People don't expect me to be funny all the time | India Forums

नवीन त्याच्या कॉमेडियन होण्याच्या प्रेरणेबद्दल सांगत होता. पूर्वी गणेशोत्सवानिमित्त मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये खूप सारे कार्यक्रम होत. कुठे रेकॉर्ड डान्स तर कुठे ऑर्केस्ट्रा असं त्याचं स्वरूप असायचं. या ऑर्केस्ट्रामध्ये सेम टू सेम आवाजात कशी काय लोक गाणी गातात याचं मला कुतूहल वाटायचं. अशाच एका ऑर्केस्ट्रामध्ये मी माधव मोघे यांना मिमिक्री करताना पाहिलं. दुर्दैवाने माधवजी आज आपल्यात नाहीत. पण त्यांना पाहिल्यानंतर माझ्या मध्ये इंटरेस्ट बिल्टअप झाला. मी घरी जाऊन त्यांनी जे आवाज काढले होते, ते सर्व आवाज ट्राय करत गेलो. आपसूकच मला हे कळलं की, मी बऱ्यापैकी आवाज काढू शकतो. मग मी काही मराठी कलाकारांचे आवाज काढायला सुरुवात केली कारण मूळचा आम्ही मराठी माध्यमातून शिकलेलो. गणपत पाटील, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, दादा कोंडके अशा विविध कलाकारांचे आवाज मी शिकत गेलो आणि नंतर कळलं की, अरे हे तर प्रोफेशन आहे !… तोपर्यंत माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं. त्यामुळे नंतर मी इंटर कॉलेजिएट स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. ते करता करता मी कधी व्यावसायिक स्तरावर काम करू लागलो हेच कळलं नाही. म्हणजे बारावीत असतानाच मी मिमिक्री आर्टिस्ट झालो होतो.

दुसरीकडे घरच्या पातळीवर “अभ्यासावर लक्ष असू द्या, बाकी काहीही करा पण अभ्यास ही फर्स्ट प्रायोरिटी असू द्या. ” संसं काळजीपोटी वडिलांचं नवीनला सततचं सांगणं असायचं. नवीन सांगतो की, मी त्यांना अभ्यास एके अभ्यास करतोय हेच सातत्याने दाखवायचो. मात्र माझं लक्ष चित्रपट, टीव्हीवरल्या मालिकांकडे जास्त होतं. आमच्या शाळेच्या वाटेवरच फिल्मीस्तान स्टुडिओ होता. पावलं हमखास त्याच्या गेट समोर थांबायचीच. त्यामुळे कुठला ना कुठला कलाकार हमखास पाहायला मिळायचा. अगदी उषा नाडकर्णींपासून नाना पाटेकर, समीर कक्कड, गोविंदा, धर्मेंद्रजी! बच्चनजी या सगळ्यांना आम्ही पाहिलं होतं. आज अशा मान्यवरांबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा बालपणीचे ते दिवस पुन्हा आठवतात.

गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये नवीनच्या वाट्याला स्टँडअप कॉमेडियन म्हणून, जे काही यश आलं त्याबद्दल नवीन म्हणतो की, माझ्या लेखी यश म्हणजे आप्त, स्वकीय, मित्र यांच्याबरोबर हसत खेळत समाधानी राहणं. त्यांच्या वेळी अवेळी त्यांना उपयोगी पडणं… आणि मला या गोष्टीचं समाधान आहे की माझ्या कर्तेपणाच्या दिवसांमध्ये मी आपल्या माणसांसोबत होतो, त्यांच्यासोबत उभा राहीलो.

नवीन प्रभाकरने आत्तापर्यंत बॉलिवुडचे कलाकार, गायक, नर्तक यांच्यासोबत, तसेच निरनिराळ्या ग्रुप सोबत तीन हजारांपेक्षा जास्त शो केले आहेत. असं असतानाही संपूर्णपणे स्टँडअप कॉमेडीला वाहिलेला शो करणं हे गेल्या १५ वर्षांपासून त्याच्या मनात होतं. कारण कॉर्पोरेट कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जावं लागायचं. त्यामुळे तो प्रचंड व्यस्त होता. पब्लिक शो साठी वेळच मिळत नव्हता. तिथेही प्रेक्षक तोंडभरून कौतुक करायचे आणि सहज बोलण्याच्या ओघात ‘पैचान कौन’चा विषय आपसूक निघयचा. त्यावेळी समोरच्या रसिकांची ही मागणी असायची की, आम्हाला तशाप्रकारचाच सलग दीड-दोन तासांचा तुमचा शो बघायचा आहे. नवीन म्हणतो की, त्यामुळे मलाही कुठेतरी असं वाटू लागलं की, संपूर्णपणे स्टँडअप कॉमेडीला वाहिलेला शो थिएटरमध्ये आणला पाहिजे. कारण पु. ल. देशपांडेंची ‘बटाट्याची चाळ’, लक्ष्मण देशपांडेचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या मैलाचा दगड ठरलेल्या ‘स्टँडअप कॉमेडी’ नंतर थिएटरमध्ये विनोदाचे वेगवेगळे अंग असणारी आणि संपूर्णपणे विनोदाला वाहिलेली कलाकृती आलीच नव्हती. तसंच सध्या आपल्या सभोवताली इतकं विचित्र नकारात्मक घडतंय, त्यात प्रेक्षकांना काहीतरी सकारात्मक हवंय. त्यातूनच ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ या कार्यक्रमाची संकल्पना सुचली. ”

Navin Prabhakar's Best Comedy Ever - YouTube

नवीन गेल्या दोन दशकांपासून, OTT शो व्यतिरिक्त टेलिव्हिजन वरून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत होता. तो पहिल्यांदा असा कार्यक्रम रंगमचावर करत आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक शो ला, ८०० ते ९०० प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत या नवीन तुफानी शोची प्रेक्षकांनी मजा लुटली आहे. नवीन त्याबद्दल सांगतो की, प्रेक्षकांनी भरभरून कौतुक करत, हा कार्यक्रम बऱ्याच अगोदर करायला हवा होता असं सुध्दा हक्काने म्हटलंय. मला जगभरात विखुरलेल्या माझ्या चाहत्यांकडून तिथे येऊन ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ सादर करण्यासाठी फोन येत आहेत.

 


हेही वाचा :

‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीत शाहरुखने मारली सनी देओलला मिठी; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -