घरमहाराष्ट्रMaratha Reservation: जरांगेंना प्रसिद्धीची नशा; भुजबळांची टीका, म्हणाले- ते मारुतीचं शेपूट...

Maratha Reservation: जरांगेंना प्रसिद्धीची नशा; भुजबळांची टीका, म्हणाले- ते मारुतीचं शेपूट…

Subscribe

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं आहे.

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं आहे. अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर केलेल्या आरोपांवर त्यांनी भाष्य केलं आहे. तसंच, जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढली आहे. त्यामुळे ते काहीही ऐकणार नाहीत. त्यांचं मारुतीचं शेपूट झालं आहे, त्यांच्या मागण्या या संपणाऱ्या नाहीत, ते कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाहीत, असा हल्ला भुजबळांनी चढवला. ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी त्यांनी जरांगेंनी सातत्याने बदललेल्या आपल्या भुमिकांवर भाष्य केलं आहे. (Maratha Reservation Manoj Jarange are addicted to fame Criticism of Chhagan Bhujabal said it is the tail of Maruti)

भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगेंना काही कळत नाही. विनाकारण गावबंद करा म्हणत आहेत. वयस्कर लोकांना उपोषणाला बसवत आहेत. त्यांना काही झालं तर काय करायचं? सर्व बाबींमध्ये सरकार सकारात्मक विचार करत आहे. प्रसिद्धीची नशा जरांगेंना चढली आहे, त्यामुळे ते वाटेल ते बोलतात. 10 तारखेला उपोषणाबाबत समजातील लोकांना विचारात न घेता, ते उपोषणाला बसले. श्रेय वादासाठी स्वत: हून हे उपोषणाला जाऊन बसले, असा आरोपही भुजबळांनी केली.

- Advertisement -

कोर्टात याला विरोध होणार

सरसकट आरक्षण कोणालाच देता येणार नाही. हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही. कोर्टात याला विरोध होणार आहे. सरकारही याला विरोध करत नाही. कारण मराठा समजाची मतं ही यांच्या विरोधात जातील म्हणून सरकार सावध भूमिका घेत आहे, असंही त्यांनी सरकारबाबत सांगितलं.

…म्हणून बारसकर विरोधात

बारसकर यांची व्हायरल क्लिप मी पाहिली होती. त्यांच्याशी विधानसभेत बोललो. ते 2006 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढत आहेत. ते जरांगेंसोबत असायचे. त्यांच्या गुप्त बैठका, बेताल व्यक्तव्यांना कंटाळल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Ludo Game Turns Deadly: लुडो बेतला जीवावर; कात्रीने मित्राचा कापला गळा अन् हत्येनंतर स्वतःलाही संपवलं)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -