घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar : राजकीय मैदान 57 वर्षांपासून गाजवणारा तेल लावलेला पैलवान म्हणजेच...

Sharad Pawar : राजकीय मैदान 57 वर्षांपासून गाजवणारा तेल लावलेला पैलवान म्हणजेच…

Subscribe

मुंबई : राजकारणातील तेल लावलेला पैलवान असं शरद पवारांविषयी नेहमीच बोललं जातं. त्याला कारणही तसंच आहे. राज्यात कुठेही काही घडले तरी त्यामागे शरद पवारांचाच हात आहे असं म्हणलं जातं. परंतु याच राजकीय मैदानातील पैलवानाला भारी पडला तो त्यांचाच पुतण्या. असे असतानाच आता आगामी लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान दूर नसून, कोण कोणाला शह देतो हे पहावे लागणार आहे. असे असतानाच 22 फेब्रुवारी 1967 रोजी राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शरद पवारांना राजकीय मैदानात 57 वर्ष पूर्ण होत आहे. राजकीय पटलावर 50 वर्षांहून अधिक काळ आपल्याविषयी कुतूहल निर्माण करुन ठेवणं सोपं नसताना ते करुन दाखवलं फक्त शरद पवारांनी. म्हणून राजकीय मैदान 57 वर्षांपासून गाजवणारा तेल लावलेला पैलवान म्हणजेच शरद असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Sharad Pawar The oiled wrestler who dominated the political arena for 57 years is)

राज्यातील राजकारणात 2019 च्या विधानसभा निवडणुकापासून एक नव्हे तर अनेक राजकीय उलथापालथी बघायला मिळाल्या. याच पाच वर्षांत राज्यातील दोन पक्ष आणि एक परिवार फुटल्याचे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश आहे. शिवसेना फुटली या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच पवारांच्या राष्ट्रवादीलाही बंडाचा सामना करावा लागला. त्या बंडानंतर राज्यात काय घडलं ते सगळं उघड आहे. असे असतानाच मात्र, या राजकीय घडामोडीवर सर्व स्तरातून उलट सुलट प्रतिक्रिया येत असतानाही शरद पवार मात्र स्थिर असल्याचे दिसून येतात. तेव्हा ही राजकीय घडामोड त्यांच्यासाठी तेवढी मोठी तर नसावी अशीही चर्चा सध्या रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर आज 22 फेब्रुवारी रोजी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 57 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा शरद पवारांचा काँग्रेस एस ते आय काँग्रेसपासून पुलोद आघाडी आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता एनसीपी- शरदचंद्र पवार पक्षापर्यंतचा प्रवास तेवढाच रंजक आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.

- Advertisement -

हेही वाचा : CBI Raids on Satyapal Malik: सत्यपाल मलिकांच्या घरासह 30 ठिकाणांवर CBI ची छापेमारी, काय आहे प्रकरण?

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 साली पुणे जिल्ह्यातील बारामतीत झाला. शरद पवारांचं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं. विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रीय झालेले शरद पवार हे पहिल्यांदा 1967 मध्ये बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारच्या काळात शरद पवार मंत्रीही होते. मात्र, 1977 मधील आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले.

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील, शरद पवार हे रेड्डी कॉंग्रेसमध्ये गेले. राजकीय प्रवासात गती घेतलेले शरद पवार 1972 आणि 1978 च्या निवडणुकीतही विजयी झाले होते. 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतरावदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले होते.

हेही वाचा : Nadda Meet Cm Shinde : जेपी नड्डांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; जागावाटपाबाबत चर्चा?

काँग्रेस एस आणि पुलोदचा प्रयोग

18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (आय) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस (एस) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या हाती काँग्रेसची सत्ता आली.

राजीव गांधी यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच काळात 1984 मध्ये शरद पवार हे बारामती मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. मात्र लगेचच ते दिल्लीतून परतले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1986 मध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला अन् 1988 मध्ये दुसऱ्यांदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

1999 ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंतचा प्रवास

1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून दुसऱ्यांदा बंड करत पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. तेव्हा पक्षाला घड्याळ हे चिन्ह मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या राजकीय जीवनात मोठी घडामोड झाली. त्यांच्याच कुटुंबातील सदस्याने मुळ पक्षावर दावा ठोकून तो मिळवलाही. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार असं नाव मिळालं आहे. या नवीन पक्षाला जुन्याच शरद पवारांसह लोक कसे पसंत करतात हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : मविआतील जागा वाटपाचा तिढा सुटला? राऊतांची महत्त्वाची माहिती

सुप्रिया सुळेंची पोस्टने वेधलं लक्ष

राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर पवार कुटुंबात आता एकमेंकावर आरोप होत आहेत. यामध्ये शरद पवारांच्या कन्या आणि अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शरद पवारांच्या पहिल्या विजयी निवडणुकीची आठवण करुन देणारी पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते.

बघता- बघता लोकच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे शरद पवार. त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज 57 वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी पवारांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खुप मोलाचे आहे. अशा शब्दांत सुळेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -