घरअर्थजगतMarket News : टोमॅटोपाठोपाठ आता कांदा रडवणार; भावात 10 ते 15 रुपयांचीट वाढ

Market News : टोमॅटोपाठोपाठ आता कांदा रडवणार; भावात 10 ते 15 रुपयांचीट वाढ

Subscribe

सध्या टोमॅटो 150 ते 200 रुपये किलोने विकले जात आहेत. सोबतच भाजीपाल्यामधील कोथिंबीर, मेथीची जुडी 40 ते 50 रुपयांना मिळत आहे.

मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या तर गेल्या, त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीमुळे सर्वसामान्य चिंतित असतानाच आता त्यामध्ये महागाईची भर पडली आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून टोमॅटोचे भाव उतरण्याचे नाव घेत नसतानाच आता जीवनाश्यक असलेला कांदाही महागणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी तर येणारच असून, गृहीणींचे बजेट कोलडणार आहेत.

सध्या टोमॅटो 150 ते 200 रुपये किलोने विकले जात आहेत. सोबतच भाजीपाल्यामधील कोथिंबीर, मेथीची जुडी 40 ते 50 रुपयांना मिळत आहे. यामुळे अनेकांनी कडधान्य खाणेच पसंत केले असतानाच या भाजीला फोडणीसाठी आवश्यक असलेला कांदाही महागत जात असल्याचे चित्र आहे. काही दिवसापूर्वी 15 ते 20 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 35 ते 40 रुपये किलोने विकल्या जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या भूमीअभिलेख नोंदी, ई-केवायसी, आधार लिंकिंगसाठी 15 ऑगस्टपर्यंत मोहीम

भावात 10 ते 15 रुपयांनी वाढ

नवी मुंबईतील एपीएमसी कांदा मार्केटमध्ये आज झालेल्या हर्रासीमध्ये कांद्याचे भाव वाढल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोने मिळणारा कांदा आज 35 ते 40 रुपये किलोने विकल्या गेला आहे. कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याचे कारण अवकाळी पाऊस असल्याची माहिती कांदा व्यावसायिकांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : डबल इंजिन फेल म्हणून ट्रिपल इंजिन सरकार; नाना पटोलेंचा जोरदार हल्लाबोल

फक्त टोमॅटो,कांदाच नाही तर मिरचीही खातेय भाव

सध्या बाजारामध्ये टोमॅटो हा 100 ते 150 रुपये किलोने विकला जात असून, आता त्या पाठोपाठ कांद्याच्या दरामध्ये देखील वाढ होत आहे. टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली त्या पाठोपाठ हिरवी मिरची, कोथिंबीर व इतरही पालेभाज्या महागल्यामुळे अनेकांच्या जेवनातील टोमॅटो कोथिंबीर जिरे, गायब झालेले पाहायला मिळत आहे.

आवक कमी झाल्याने वाढले भाव

मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत राज्यात अवकाळी पावसाने कहर केला होता. यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करुन तो साठवून ठेवला होता. आता तोच कांदा बाजारात काही प्रमाणात येत आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने बाजारात कांद्याची आवक घटली आहे. यामुळे आहे त्या कांद्याचे दर वाढलेले दिसत आहेत.

हलक्या प्रतिचा कांदा बाजारात

मुंबईतील भाजीबाजारात कांद्याची आवक कमी असून 50 ते 60 टक्के हलक्या प्रतिचा कांदा दाखल होत आहे. तसेच, पावसाने दांडी मारल्याने नवीन कांदा लागवड केलेले उत्पादन देखील हाती लागणार नाही, त्यामुळे पुढील कलावधीत कांदा आणखीन वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -