घरट्रेंडिंगमुंबईकरांनो 'ही' जबाबदारी आपलीच ना ?

मुंबईकरांनो ‘ही’ जबाबदारी आपलीच ना ?

Subscribe

रेल्वेच्या ब्रिजवर, रस्त्याच्या कानाकोपऱ्यात, भर चौकात हे मास्क टाकून आपण मुंबईतल संकट वाढवतोय नाही का ? मास्कची योग्य विल्हेवाट न लावता तो फेकण म्हणजे करोनाचा प्रसार वाढवण्याचा धोका ओढावून घेण्यासारख आहे. म्हणूनच ही जबाबदारी आपलीच आहे, बरोबर ना. मुंबईत प्रत्येक स्टेशनवर विकले जाणारे मास्क वापरानंतर आता ठिकठिकाणी दिसायला लागले आहेत. आपला मास्क कोणी तरी दुसरा उचलेल ही मानसिकता मास्क काढता क्षणीच बदलायला हवी. आज मुंबईतल्या माटुंगा, माहीममच्या रस्त्यावरील ही स्थिती. माटुंगा सेंट्रल आणि माटुंगा वेस्टर्नला जोडणारा रेल्वेचा झेड ब्रिजवरदेखील मास्क फेकण्यात आल्याचे या फोटोंमधून दिसते आहे.

z bridge mask
झेड ब्रिजवर फेकण्यात आलेला मास्क

मुंबईचे रस्ते, रेल्वे स्टेशन सकाळीच स्वच्छ करणारे कर्मचारीच फिरकले नाहीत तर शहरावरचे संकट आणखी किती वाढेल याचा कल्पना तरी करून पहा. मुंबईत अनेक ठिकाणी आता हे मुंबईकरांनीच वापरलेले मास्क ठिकठिकाणी फेकलेले दिसत आहेत. विकत घेताना हे मास्क स्वस्त असले तरीही कसेही फेकल्यामुळे मुंबईच्या संकटात आणखी भर पडणार आहे. शहरातल्या रेल्वे ब्रिजपासूनच ते भर चौकातही हे मास्क आज सकाळीच पहायला मिळत आहेत. महापालिकेचे कर्मचारी हा मास्क उचलतील, आपण आपली मास्क वापराची जबाबदारी पार पाडू, पण विल्हेवाट कोणी तरी लावेलच या मानसिकतेमधून बाहेर पडायला हव. आपला मास्क वापरल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लागेलच हीदेखील आपली जबाबदारी नाही का ?

- Advertisement -
mask
माहीम परिसरात फेकलेला मास्क

मास्कचा वापर कसा कराल आणि मास्कची विल्हेवाट कशी लावाल ?

लक्षात ठेवा, मास्क केवळ आरोग्य कर्मचारी, काळजी घेणारे आणि ताप आणि खोकला यासारख्या श्वसन लक्षणे असलेल्या व्यक्तींनी वापरला पाहिजे.
मास्कला स्पर्श करण्यापूर्वी, अल्कोहोल-आधारित हॅण्ड सॅनिटायजरने चोळा किंवा साबण लावा आणि पाण्याने हात स्वच्छ करा
जिथे मेटल पट्टी आहे ती वरची बाजू आहे
बाहेर (रंगीत बाजू) असेल अशी योग्य बाजूची खात्री करा
मास्क खाली खेचा जेणेकरून ते आपले तोंड आणि हनुवटी व्यापेल.
वापरानंतर मास्क काढा, आपल्या चेहऱ्यापासून मुखवटा दूर ठेवा, मुखवटाच्या संभाव्य दूषित पृष्ठभागास स्पर्श न करता तो काढा
वापरल्यानंतर ताबडतोब बंद डब्यात मास्क टाकून द्या
मास्कला स्पर्श करून किंवा टाकून दिल्यानंतर हाताची स्वच्छता करा. अल्कोहोल-आधारित हॅण्ड सॅनिटायजरने चोळा किंवा साबण लावा आणि पाण्याने हात स्वच्छ करा

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोना : WHO २१ अपेक्षित प्रश्न – उत्तरे


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -