घरताज्या घडामोडीसिल्व्हर ओकवर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार, बैठकीनंतर अनिल परबांची माहिती

सिल्व्हर ओकवर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार, बैठकीनंतर अनिल परबांची माहिती

Subscribe

राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी आंदोलनात सहभाग घेतला अशा १०९ कर्मचाऱ्यांवरील कारवाईबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती अनिल परब यांनी केली आहे. तसेच राज्यात एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा केली आहे. ज्या नादुरुस्त एसटी आहेत त्यांना दुरूस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी हायकोर्टाने दिलेल्या वेळेनुसार २२ एप्रिलपर्यंत रूजू व्हावे असे वक्तव्य अनिल परब यांनी केले आहे.

एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळील अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर येण्यास सांगितले आहे. आता दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे आणि संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा विस्कळीत झाली होती. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी किती गाड्या लागतील कसे मार्ग ठरवण्यात येतील या सगळ्या पार्श्वभूमीवर एसटी जशी पूर्वी चालत होती तशी चालवण्यासाठी चर्चा करण्यात आली असे अनिल परब म्हणाले आहेत.

- Advertisement -

नादुरूस्त गाड्या दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद

कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी पूर्ववत लोकांच्या सेवेत जाण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासंदर्भात बैठक होती. ज्या गाड्या बऱ्याच दिवस उभ्या आहेत. त्या नादूरुस्त असतील. नादुरूस्त गाड्या दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आले. कर्मचाऱ्यांची वापसी कशी करायची ते ठरवण्यात आले. ज्या गाड्या कुठल्या कुठल्या मार्गावर धावायला पाहिजे याबाबत चर्चा झाली. संप आणि कोरोनामुळे एसटी विस्कळीत झाली होती. आता दोन्ही प्रश्न मिटले आहेत त्यामुळे कोविडपूर्व स्थिती एसटी सुरु करण्याबाबत बैठक घेण्यात आली अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

..त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

ज्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी सहभाग घेतला होता. या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात यावी याबाबतही निर्णय घेतला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

गुन्हेगार नसाल तर बाहेर या

आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी पैसा गोळा करुन त्याचा अपहार केला असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आहे. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिले की, पैसे गोळा केले आहेत. राजभवनात पैसे गेले नाही असे स्पष्ट झाले आहे. हा गुन्हा आहे त्याची चौकशी होणार आहे. गुन्हेगार नाहीत तर लपताय कशाला, रडताय कशाला असे सोमय्या म्हणत होते मग ते आता गुन्हेगार नसतील तर त्यांनी बाहेर यावे असे अनिल परब म्हणाले.


हेही वाचा : सोमय्या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -