घरदेश-विदेशदेशातील 8 शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे 1 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू; रिपोर्टमधून...

देशातील 8 शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे 1 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू; रिपोर्टमधून खुलासा

Subscribe

देशातील वायू प्रदुषणामुळे 8 महत्वाच्या शहरांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबाद या आठ शहरांमध्ये २००५ ते २०१८ या कालावधीत एक लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू झाला, अशी माहिती वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने दिली आहे. आफ्रिका, आशिया आणि पश्चिम आशियातील 46 शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून ही माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे दिसून येत असून वायू प्रदूषकांच्या संपर्कात येणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याकडे संशोधकांनी लक्ष वेधले आहे.

नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) चे प्रमाण 14 टक्क्यांपर्यंत आणि PM 2.5 मध्ये आठ टक्क्यांनी दरवर्षाला वाढत आहे. अमोनियाची पातळी 12 टक्क्यांनी वाढली आहे आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे 11 टक्क्यांनी प्रतिक्रिया देतात.

- Advertisement -

संशोधकांच्या टीममध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश असून हवेच्या गुणवत्तेत झपाट्याने होणारी घसरण ही रस्ते वाहतूक, कचरा जाळणे, कोळशाचा व लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर अशा औद्योगिक व घरगुती स्रोतांमुळे होत असल्याचे सांगितले. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि ब्रिटनस्थित युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे (यूसीएल) कर्ण व्होरा यांनी सांगितले की, जमीन स्वच्छ करण्यासाठी आणि शेतीतील कचरा टाकण्यासाठी जैविक पदार्थ जाळण्याचे योगदान हवेच्या प्रदूषणात सर्वाधिक आहे.

बर्मिंगहॅम विद्यापीठातील पीएच.डी.ची विद्यार्थिनी व्होरा म्हणाली, “आमच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, आम्ही या शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहोत. तर 46 पैकी 40 शहरांमध्ये एनओ 2 प्रदूषण आणि 46 पैकी 33 शहरांमध्ये पीएम 2.5 च्या पातळीत दीड ते चार पट वाढ झाली आहे. ही स्थिती वाढती लोकसंख्या आणि हवेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे होते, संशोधनात असेही आढळून आले की, वायू प्रदूषणात दक्षिण आशियातील शहरांमध्ये विचित्र मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे.

- Advertisement -

या संशोधनानुसार, बांगलादेशची राजधानी ढाका येथे वायू प्रदूषणामुळे 24 हजार अतिरिक्त अकाली मृत्यू झाले, तर भारताच्या मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबादमध्ये हा आकडा सुमारे एक लाखाच्या आसपास होता. संशोधकांनी अधोरेखित केले की, भारतात सखोल देखरेखीचे जाळे आहे जे स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकारी तसेच संशोधन संस्थांद्वारे चालविले जाते.


Trikut ropeway Accident : अजूनही रोपवेत अडकलेत आठ जण; 24 तासांपासून बचावकार्य सुरू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -