घरताज्या घडामोडी'बाप बेटे जेल जाऐंगे', भाग सोमय्या भाग चित्रपट काढा : संजय राऊत

‘बाप बेटे जेल जाऐंगे’, भाग सोमय्या भाग चित्रपट काढा : संजय राऊत

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'बाप बेटे जेल जाऐंगे' असं ट्वीट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, 'भाग सोमय्या भाग चित्रपट काढा', असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि पुत्र नील सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी अटक टाळण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ असं ट्वीट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, ‘भाग सोमय्या भाग चित्रपट काढा’, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

“जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणताय, आम्ही घाबरत नाही म्हणताय, तुम्ही इतरांनाही त्यांच्या भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारताय, कोर्टाला आणि कायद्याला समोरे जा म्हणताय, तर मग तुम्ही का पळतायेत. तुम्ही कायद्याचं पालन करण्यासंदर्भात लोकांना ज्ञान देता ना. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात जो घोटाळा झालेला असा दळबद्री प्रकार याआधी देशात कधीच झाला नव्हता. तुम्ही लोकांच्या आणि देशाच्या भावनांशी खेळताय. ज्या आयएनएस युद्धनौकेमुळे आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो, पाकिस्तानची फाळणी करू शकलो, कराची, चिरगाव बंदर बेचिराख करू शकलो. त्यामुळं ही युद्धनौका भंगारात न जाता ती स्मरणात राहावी यासाठी युद्धनौकेवर संग्रहालय बनाव अशी भावना सगळ्यांची होती. बाळासाहेब ठाकरेंनीही याबाबत भूमीका मांडली होती. यासाठी राष्ट्रपतींनाही भेटलो होतो. आम्ही सगळे त्यावेळी भाजपाचे खासदारही होते. महाराष्ट्रात त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडेसुद्धा त्यावेळी आम्ही यासंदर्भात विनंती केली होती. मात्र त्यांनी असमर्थता दाखवली. त्यानंतर या महाशयाने (किरीट सोमय्या) पैसे गोळा करायला सुरूवात केली, की ‘आता मी पैसे गोळा करणार’.”

- Advertisement -

“डिसेंबर २०१३ साली १४० कोटी जमा केल्यासंदर्भात त्याने ट्वीट केलं होतं. तसंच, त्यावेळी त्याने ठिकठिकाणी ७११ डबे गच्च भरले. त्याशिवाय, सेव विक्रांतच्या नावावर त्यानी अनेकांकडून पैसे घेतले. याच्या पावत्या नसतात. आता कोणीही पुढे येत नाही. मला माहिती आहे, त्यावेळी अनेकांकडुन मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला जात होता. मी सांगतोय ५८ कोटी त्यानी गोळा केले पण, त्यानी केलेल्या त्यावेळेच्या ट्वीटमध्ये १४० कोटी रुपये असल्याची माहिती समोर येतेय. हे पैसे तेव्हा राज भवनात जमा करू अशी त्यांची भूमीका होती. तेव्हा त्यांना माहित नव्हतं का?, की राजभवनाचे अकाउंट नाहीये.”

“खरंतर, राजभवनाच्या नावावर अनेकांनी चेक दिले असल्याचे बऱ्याच काळापूर्वी फोटो पाहिलेत. जर राजभवनाचे अकाउंट नव्हते तर त्यानी ते पैसे मुख्यमंत्री निधीत अथवा केंद्रात नेऊन द्यायला हवे होते. आता मी असं ऐकलं की त्यांचे वकील सांगतात की त्याने पैसे पक्षाकडे जमा केले होते. विक्रांतच्या नावावर तुम्ही मागताय, राजभवनात जमा करू असंही सांगताय आणि पैसे पक्षाकडे देताय. याचाच अर्थ मी आधी सांगत होतो त्याप्रमाणे त्यानी हे पैसे निवडणुकीत वापरले. आता त्यानी हा गुन्हा कबुल केला.”

- Advertisement -

“मी सातत्यानं सांगत होतो किरीट सोमय्याने जमा झालेल्या निधीतील २०-२५ कोटी रुपये निवडणुकीत वापरले. उरलेले पैसे त्याने पीएमसी बॅंकेमध्ये पांढरे करून निकॉन इन्फ्रा नावाच्या त्याच्या मुलाच्या कंपनीमध्ये वळवले आणि हा सगळा तपास आर्थिक गुन्हे शाखा (इओडब्ल्यू) जेव्हा त्यांना ताब्यात घेईल तेव्हा समोर येईल. यानंतर आता खरंतर, भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात खुलासा केला पाहिजे.”

“किरीट सोमय्या आता सांगतो की पैस मी त्यावेळी पक्षाकडे जमा केले होते. मग १३ वर्ष काय तुम्ही झोपला होतात. आता आम्ही हे प्रकरण उघडं केल्यानंतर तुम्ही स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी सांगताय. त्यामुळं किरीट सोमय्यासह भारतीय जनता पक्षालाही गुन्हेगार करायचं का? हे आता सरकारला ठरवावं लागेल. तसंच, भाजपाकडे किरीट सोमय्याने पैसे गोळा केले असतील तर, त्याची पावती कुठे?, भाजपाने या पैश्याचे काय केलं? विक्रांत वाचवण्यासाठी काय केलं? असे प्रश्न आता या तपासामध्ये उपस्थित पुढे येतील. पण किरीट सोमय्याने विक्रांत भंगारात टाकताना भाजपालाही बुडवायाचा प्रयत्न केला. ‘मै तो डुंबुंगा लेकीन, तुमको भी लेकर डुबुंगा’, असं संजय राऊत यांनी म्हटलं.”

“हे चोरलपंगे कोणाचे नसतात. त्याचे घोटाळे समोर आल्याने तो भाजपालाही घेऊन बुडण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा-पुन्हा सांगतोय की, किरीट सोमय्या हा एक ब्लॅकमेलर आहे. हा एक आर्थिक माफिया टोळी चालवतो. मुंबईतील बिल्डर्स, उद्योगपती यांसह इतरांना ब्लॅकमेल करून आणि ईडीच्या धमक्या देऊन मोठ्या प्रमाणात पैसे काढतो. हे खुप मोठं रॅकेट असून मी अनेकदा बाहेर काढलंय. ईडीच्या कार्यालयात जाऊन करतो काय हा, याचाही लवकरच पर्दाफाश करणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. आज किरीट सोमय्याचे एक प्रकरण मार्गी लागतंय आणि अशी अनेक प्रकरणं रांगेत उभी असून याचा संबंध भारतीय जनता पार्टी पक्षाशी येतोय.”

“किरीट सोमय्या यांना दिलेली सुरक्षा केद्राने काढावी. तसंच, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी त्याचा तपास करून त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यावं”, अशी मागणीही यावेळी संजय राऊतांनी केली आहे.


हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ, न्यायालयाचा मोठा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -