घरमुंबईपालघरमध्ये घरात सापडला १३ फूट लांबीचा आणि २२ किलो वजनाचा अजगर

पालघरमध्ये घरात सापडला १३ फूट लांबीचा आणि २२ किलो वजनाचा अजगर

Subscribe

पालघरमधील सावटा घुंगरपाडा गावामध्ये भला मोठा अजगर सापडला आहे. सुरेश मोहन दुबळा यांच्या घरामध्ये हा अजगर घुसला होता. घरामधील कोंबड्या ओरडण्याचा आवाज आल्याने सुरेश कोंबड्या पहायला गेले असता त्यांना अंड्यावर बसवलेली कोबंडी खाताना अजगर पहायला मिळाला. घाबरलेल्या सुरेश यांनी घरामध्ये झोपलेली पत्नी आणि मुलांना घराबाहेर नेले. त्यानंतर त्यांनी गावातील लोकांना बोलावून सर्पमित्र एरिक ताडवाला आणि पूर्वेश तांडेल यांना बोलावले. रात्री उशीरा सव्वा दोनच्या सुमारास त्यांनी या अजगराला पकले आणि डहाणू वन विभागाच्या ताब्यात दिले. या अजगराची लांबी १२ ते १३ फूट आणि वजन २२ किलो ऐवढे आहे.

A Big Python Found in Palghar

पालघरमधील सावटा घुंगरपाडा गावामध्ये एका घरात सापडला भला मोठा अजगर… लांबी १२ ते १३ फूट, वजन २२ किलो. सर्पमित्र एरिक ताडवाला आणि पूर्वेश तांडेल यांनी या अजगराला पकले आणि डहाणू वन विभागाच्या ताब्यात दिले.

Posted by My Mahanagar on Monday, August 20, 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -