घरमहाराष्ट्र'नेटवर्कमुळे'च गायब झाले होते पुण्यातील कुटुंब

‘नेटवर्कमुळे’च गायब झाले होते पुण्यातील कुटुंब

Subscribe

नेटवर्कच्या सावळ्या गोंधळाने कुटुंबांच्या नातेवाईकांशी त्यांना संपर्क करता आली नाही. त्यामुळे ही सात जण अडचणीत नाहीत ना ? अशा भिती या नातेवाईकांना वाटू लागली.

हडपसर येथील मगर आणि सातव कुटुंब हरवल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. पण आता हे कुटुंब सापडल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, फोनला नेटवर्क नसल्यामुळे या कुटुंबाला कोणाशी संपर्क करता आला नाही. त्यामुळेच सगळा गोंधळ झाल्याचे कळत आहे. दरम्यान, मगर आणि सातव कुटुंब सुखरुप असल्याचे कळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या नातेवाईकांनी नि:श्वास सोडला आहे.

वाचा- फिरायला गेलेली दोन कुटुंब बेपत्ता

नेटवर्कमुळे झाला गोंधळ

सातव आणि मगर कुटुंब खडवासलाला फिरायला गेले होते. या परिसरात नेटवर्क नेहमीच कमी असते. अनेकदा फोनला सिग्नल मिळत नाही. शिवाय ते राहत असलेल्या गेस्ट हाऊस परिसरातील लाईट गेल्यामुळे त्यांना फोन चार्ज करायलाही मिळाले नाही, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे नेटवर्कच्या सावळ्या गोंधळाने कुटुंबांच्या नातेवाईकांशी त्यांना संपर्क करता आली नाही. त्यामुळे ही सात जण अडचणीत नाहीत ना ? अशा भिती या नातेवाईकांना वाटू लागली. त्यामुळेच त्यांनी पोलीसात तक्रार केली.

- Advertisement -

अशा ठिकाणी जाताना काय घ्याल काळजी?

१.  फिरायला बाहेर जाताना नेहमी ज्या ठिकाणी जाणार तेथील हॉटेलचा फोन नंबर देऊन ठेवा.

२. नैसर्गिक ठिकाणांवर फिरायला जाताना अनेकदा नेटवर्क नसते. अशावेळी त्या ठिकाणी पोहोचण्याआधी फोन, मेसेज करुन ठेवा. शक्य असल्यास दर तासाने आपली खुशाली कळवत राहा.

- Advertisement -

३. अनेकदा प्रवासात फोनचा अधिक वापर केल्याने फोनची बॅटरी लो होते. अशावेळी एखादा साधा फोन देखील सोबत ठेवा.

४. अशा ठिकाणी सार्वजनिक फोन बुथ असेल तर त्याची माहिती घेऊन ठेवा.

५. हल्ली प्रत्येक जण फिरायला जाताना त्या ठिकाणाची माहिती घेत असते. त्यावेळी कोणत्या टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क काम करते याची माहिती घेऊन ठेवा.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -