घरमुंबईबैलघोडा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचार्‍यांचा तुटवडा

बैलघोडा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचार्‍यांचा तुटवडा

Subscribe

हॉस्पिटलला मंजूर असलेल्या डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गापैकी ६० टक्के कर्मचारी असून ४० टक्के कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. २००८-०९ मध्ये हॉस्पिटलमध्ये मोठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती झालेली नाही. परंतु या काळात अनेक कर्मचारी, तंत्रज्ञ निवृत्त झाले. परंतु त्यांच्या जागी नवीन भरती करण्यात आली नसल्याने सध्याच्या कर्मचारी, तंत्रज्ञ व डॉक्टरांवर प्रचंड ताण पडत आहे.

प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी परळ येथील बैलघोडा हे एकमेव हॉस्पिटल आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्राणी प्रेमी आपले प्राणी आणि पक्षी घेऊन येत असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर व कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. त्यामुळे प्राणी व पक्षी प्रेमींना उपचारासाठी बराच काळ ताटकळत राहावे लागते.

‘दि बॉम्बे सोसायटी फॉर दि प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल’ या संस्थेतर्फे परळ येथे प्राणी व पक्षांसाठी दि बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमल हे हॉस्पिटल चालवण्यात येते. या हॉस्पिटलमध्ये कुत्रा, मांजर, बैल, गाय, बकरी, पोपट असे पक्षी व प्राणी नागरिकांकडून उपचारासाठी आणण्यात येतात. तसेच घार, कावळा, घुबड, वटवाघूळ, कबूतर असे जखमी पक्षीही काही पक्षीप्रेमींकडून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात येतात. हॉस्पिटलमध्ये दररोज ७० ते ८० प्राणी व पक्षी उपचारासाठी येतात. या ठिकाणी ४०० प्राण्यांवर उपचाराची सोय आहे.

- Advertisement -

हॉस्पिटलला मंजूर असलेल्या डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गापैकी ६० टक्के कर्मचारी असून ४० टक्के कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. २००८-०९ मध्ये हॉस्पिटलमध्ये मोठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती झालेली नाही. परंतु या काळात अनेक कर्मचारी, तंत्रज्ञ निवृत्त झाले. परंतु त्यांच्या जागी नवीन भरती करण्यात आली नसल्याने सध्याच्या कर्मचारी, तंत्रज्ञ व डॉक्टरांवर प्रचंड ताण पडत आहे. हॉस्पिटलमध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या तीन जागा असून सध्या एकच सहाय्यक प्राध्यापक आहे. तर वैद्यकीय विभागात सात ते आठ डॉक्टरांची आवश्यकता आहे. महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये मिळून १०० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र यातील ४० टक्के डॉक्टरांची भरतीच करण्यात आलेली नाही. भरती करण्यासंदर्भात सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून भरतीच होत नाही, अशी माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरने दिली

आमच्याकडे असलेल्या नोंदीप्रमाणे दि बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे. कर्मचारी व तंत्रज्ञांच्या भरतीवर सरकारकडून बंदी घालण्यात आल्याने त्यांची भरती होत नाही. तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्टरांच्या भरतीबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
– ए. पी. गावडे, रजिस्टार, महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -