घरमुंबईमुंबईकरांचा प्रवास आणखीन 'बेस्ट' होणार

मुंबईकरांचा प्रवास आणखीन ‘बेस्ट’ होणार

Subscribe

तब्बल २ हजार २३६ कोटी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाने नफ्यात येण्यासाठी विविध हातखंडे आजमावण्याचा फंडा सुरू ठेवला आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास अधिक ‘बेस्ट’ होण्यासाठी आणि त्यानिमित्ताने बेस्टच्या तिजोरीला चांगला हातभार लावण्यासाठी एक ‘सुपर सेव्हर योजना’ आणली आहे. प्रवाशांना बेस्टच्या मोबाईल अँप व स्मार्टकार्ड द्वारे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत बेस्टच्या प्रवाशांना माफक भाडे दरात इच्छित प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना वाटेल त्या बस स्टॉपपासून वाटेल त्या बस स्टॉपपर्यंत एकाच भाडेदरात साध्या व एसी बसमधून सुखकर प्रवास करणे शक्य होणार आहे. ही योजना लवकरच सर्वांसाठी सर्वांसाठी अंमलात येणार आहे. बेस्टने या नवीन योजनेत ७२ प्रकारचे वेगळे प्लॅन दिले असून किमान १ दिवस ते ८४ दिवसांपर्यंत मुदतीच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रवाशांना एका बस फेरीसाठी किमान १.९९ रुपये भाडे खर्च करावे लागणार आहे. तसेच, २ फेऱ्यांच्या प्रवासासाठी ९ रुपये, एका दिवसांत ४ फेऱ्यांचा प्रवास करण्यासाठी १४ रुपये भाडे द्यावे लागणार आहे. तसेच, प्रवाशांना साध्या बसमधून १४ दिवसांत ५० फेऱ्यांसाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. २८ दिवसांत १०० बस फेऱ्यांसाठी २४९ रुपये तर १५० बस फेऱ्यांसाठी २९९ रुपये मोजावे लागणार आहेत. असे विविध प्रकारचे ७२ प्लॅन बेस्टने प्रवाशांसाठी उपलब्ध केले आहेत.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात किमान ५ रुपये ते ३०० रुपयांपर्यंत बचत होणार आहे. तर बेस्टला या योजनेत एकदम रक्कम जमा होऊन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच बेस्टने ही योजना नवीन स्वरूपात पेश केली आहे. बेस्टच्या प्रवाशांसाठी ही नवीन योजना म्हणजे, ‘माफक दरात, सुखकर व इच्छित प्रवास’, अशी ही संकल्पना असून प्रवाशांनी स्वतःचा प्लॅन स्वतः निवडून बेस्ट प्रवासाचा लाभ घ्यायचा आहे. बेस्टची ही योजना बेस्टच्या मोबाइल अॅप आणि स्मार्टकार्डवरही उपलब्ध होणार आहे.


ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेणार – अनिल परब


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -