घरताज्या घडामोडीमोफत वीज नको, पेट्रोल डिझेल स्वस्त करा - मनसे

मोफत वीज नको, पेट्रोल डिझेल स्वस्त करा – मनसे

Subscribe

मनसेने राज्याच्या आगामी अर्थसंकल्वर सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२० येत्या शुक्रवारी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणा आहे. त्याच पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी दिवसात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पावर सूचना केल्या आहेत. त्यामध्ये वीज स्वस्त करू नका, तसेच पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त करा या प्रमुख मागण्या आहेत.
mns 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अर्थसंकल्पावर सूचना
mns 2
मनसेच्या अर्थसंकल्पावर सूचना
अर्थसंकल्पाच्या निमित्ताने  ‘महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२०-२१’ संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, जयप्रकाश बाविस्कर, शराजू पाटील व मनसे सचिव श्री. वसंत फडके ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार ह्यांची भेट घेतली. काही सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या सूचना केल्या. तेव्हा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सूचनांवर विचार करून अंतर्भाव करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. आम्ही अपेक्षा करतो की ते येत्या अर्थसंकल्पात या लोकाभिमुख सूचनांच्या तरतुदी करून सामान्य जनतेला दिलासा मिळेल.

अशा आहेत मनसेच्या सूचना

• नवीन घरखरेदीत, बांधणीत अथवा वाहन खरेदीतील मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात यावी.
• सध्या पेट्रोल, डिझेल वर राज्यसरकारच्या अतिरिक्त कर ६ रु. आहे तो किमान २ रु. नी कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. महसुली तूट भरून काढण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्यावरील करांमध्ये जरूर वाढ करावी.
• आरटीओ कररचनेच्या अनुषंगाने वाहन नोंदणी शुल्कामध्ये सवलत द्यावी.
• आपल्या राज्यात विजेचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. वीज मोफत देण्यापेक्षा प्रति युनिट दर कमी केल्यास त्याचा फायदा सर्वसामान्यांना, उद्योगांना व परिणामी रोजगाराला होईल.
• बेरोजगारी भत्ता तसंच शेतात अपघाती मृत्यू झालेल्या अपघाती विमा अशा योजनांचा राज्य सरकारने अर्थसंकल्पात विचार करावा.
• महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबीय अत्यंत कठीण काळातून जात असतात. त्या कुटुंबियांना पुन्हा सक्षम उभं राहण्यासाठी सरकारतर्फे मदतीचा हात म्हणून किमान १ वर्ष धान्य, औषधं किंवा अन्य स्वरूपात मदत झाल्यास ते पीडित कुटुंब पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहण्यास मदत होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -