घरताज्या घडामोडीsanjay raut vs mohit kamboj : संजय राऊतांची खरी लॉयल्टी उद्धवजींची की...

sanjay raut vs mohit kamboj : संजय राऊतांची खरी लॉयल्टी उद्धवजींची की पवारांची? मोहित कंबोज यांचा सवाल

Subscribe

संजय राऊत यांनी मोहित कंबोजने पत्रा चाळीची जमीन खरेदीसाठी पीएमसी घोटाळ्यातील पैसा वापरला. कंबोजच देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणणार असल्याचा आरोप संजय राऊतांनी आज मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपांना उत्तर देत मोहित कंबोज यांनी सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे. त्याचवेळी संजय राऊतांची नेमकी लॉयल्टी कोणाची आहे असाही सवाल केला आहे. संजय राऊत यांनी मुंबईतील अनेक जमीन व्यवहारांशी काय संबंध असल्याचा सवालही त्यांनी केला आहे. तसेच ९३ च्या बॉम्बस्फोटांचे संजय राऊतांचे काय कनेक्शन असाही सवाल कंबोज यांनी केला आहे.  (mohit kamboj asked sanjay raut loyalty is with sharad pawar or with uddhav thackeray on patra chawl pmc money laundering )

महाविकास आघाडी सरकार गेल्या पाच महिन्यांपासून एका ३७ वर्षीय मुलासोबत झगडत आहे. याआधी नवाब मलिकांनीही खोटे आरोप केले, ट्विटरवर धमक्या दिल्या, सकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. पण नवाब मलिकांनाही तोंडघशी पडावे लागले. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेले आरोपही निराधार असल्याची टीका मोहित कंबोज यांनी केली. एखाद्या खोट्या गोष्टीसाठी सरकारची सर्व ताकद लावायची आणि लोकांना भरकटवायचे असा फसवा प्रयत्न संजय राऊतांनी आज केला. माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप हे निराधार असल्याचे स्पष्टीकरण कंबोज यांनी दिली.

- Advertisement -

संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो मोहित कंबोज यांनी दाखवत अनेकदा आर्थिक अडचणीत माझ्याकडे मदत घेतल्याचाही गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला. राऊत हे अनेकदा गणपतीला माझ्या घरी आले होते. पण आता मात्र त्यांचा गजनी झाला आहे. राऊत मला ब्लू आइड बॉय म्हणत आहेत, पण संजय राऊत हे नेमके कुणाचे ब्लू आइड बॉय आहेत ? असाही सवाल त्यांनी केला. राऊत हे उद्धव ठाकरेंचे ब्लू आइड बॉय आहेत की, शरद पवारांचे असा खोचक सवाल त्यांनी केला. तुमची लॉयल्टी नेमकी कुणाची ? पक्षात तुमची अवस्था घर का ना घाट का अशी झाली आहे. त्यामुळेच तुम्हाला शक्तीप्रदर्शन करावे लागले, असेही त्यांनी सांगितले. पण पत्रकार परिषदेला जे लोक होते ते सत्ताधारी नव्हते. राऊतांना पॉवरफुल्ल लोकांनी समर्थन केले नाही. त्यामुळे राऊतांचा हा फ्लॉप शो असल्याचा खुलासा कंबोज यांनी केला. विरोधकांचे नव्हे, तर खुद्द संजय राऊतांनाच घाम फुटल्याचा खुलासा कंबोज यांनी केला.

१० लाख चौरस फुट दराने जमीन १०० कोटींना घेतली तेव्हा इतकी महाग जमीन मुंबईत आहे का ? असाही प्रश्न त्यांनी केला. माझ्या कंपनीने २०१० मध्ये गुरू आशिषकडून जमीन खरेदी केली होती. माझे पैसे बुडवल्यासाठी तक्रार करणारी व्यक्ती स्वतः मी होतो. मी जमीन खरेदी केली होती, माझे या व्यवहारात पैसे बुडाले. म्हाडाची जमीन कॉंग्रेस आणि एनसीपीचे सरकार असताना पत्रावाला चाळीत सर्व पॉवर्सचे उल्लंघन करत सनी वधावानला चुकीच्या पद्धतीने ही जागा दिली. याठिकाणी पुर्नवसन झाले नाही. त्यामुळेच गुरूआशिष विरोधात २०१५ मध्ये गुरू आशिष देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातच एफआय़आर झाली. ईओडब्ल्यूकडेही माझीच तक्रार कोणाची आहे. कारण माझे पैसे बुडाले आहेत. त्यामुळे जी चौकशी करायची आहे, ती चौकशी करा असेही आव्हान मोहित कंबोज यांनी दिले.

- Advertisement -

ग्रॅण्ड हयातचा आणि संजय राऊतांचा काय संबंध आहे ? राजकुमार गुप्ता आणि बबली गुप्ता यांचा संजय राऊतांशी काय संबंध आहे ? मुंबईत जमीनी घेणाऱ्या या बंटी बबलीच्या व्यवहारात संजय राऊतांचा किती कट आहे ? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद छोटा शकील, हसीना पारकर यांच्याशी संबंधित अॅण्टी टेररिस्ट पैसे वसुली झाली. मुंबईत एवढी मोठी चौकशी सेंट्रल एजन्सीने चौकशी केली त्यांचे संबंध कोणासोबत आहेत ? मुंबईकर म्हणून १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटांशी संजय राऊतांचे कनेक्शन काय ? असाही सवाल त्यांनी केला. निराधार आरोपांमुळे संजय राऊतांचा चेहरा हा नवाब मलिकांसारखा एक्स्पोज झाला आहे. कोविड सेंटरचा १०० कोटींचा स्कॅम काय आहे ? राऊतांचा या घोटाळ्याशी काय संबंध आहे ? खोटे नरेटिव्ह घेऊन संजय राऊत आज उतरले आणि लोकांसमोर एक्स्पोज झाले. नवाब मलिकांसारखेच संजय राऊतही तोंडावर पडले. त्यामुळे देशाचे संविधान मानायला हवे, भाजपला बदनाम करू नका अशा शब्दात त्यांनी राऊतांच्या टिकेला उत्तर दिले.


Money laundering : मोहित कंबोजने १२ हजार कोटींची जमीन १०० कोटींना खरेदी केली, संजय राऊत यांचा आरोप

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -