घरमहाराष्ट्रराज्याचे पावसाळी अधिवेशन विधानसभा विरोधीपक्ष नेत्याशिवायच?

राज्याचे पावसाळी अधिवेशन विधानसभा विरोधीपक्ष नेत्याशिवायच?

Subscribe

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरू

फडणवीस सरकारसाठी महत्त्वपूर्ण असे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरू होत आहे. मात्र मुंबईत होणारे हे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून, काँग्रेसकडून अजूनही नवा विरोधीपक्ष नेता कोण हे ठरलेले नाही. तसेच संख्याबळानुसार काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधीपक्षनेता होणार हा देखील सस्पेन्स कायम असल्याने जर विरोधी पक्ष नेता निवडायचाच असेल तर तो अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे तुर्तास तरी विरोधकांकडून विरोधीपक्ष नेता निवडण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही.

विखेंच्या कार्यालयात आवराआवर सुरू

दरम्यान एकीकडे विरोधी पक्षनेता कोणाला करायचा या द्विधा मनस्थितीत काँग्रेस असताना दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कार्यालयात सामान आवरायला सुरूवात केली असून, विखे त्यांना मिळालेले कार्यालय खाली करत आहेत.

- Advertisement -

विखे अधिवेशनात दिसणार नाहीत? 

विशेष बाब म्हणजे विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे तसेच तूर्तास तरी भाजपा प्रवेश करत नसल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील या अधिवेशनाला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. जर मंत्रिमंडळ विस्तार झालाच आणि विखेंनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन मंत्रिपद स्विकारले तरच ते अधिवेशनात दिसू शकतात. अन्यता ते या अधिवेशनाला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मी या पदावर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझा राजीनामा सोपवला आहे. विरोधीपक्षनेते पदाचं काय करावं हे काँग्रेसचं काम आहे. मात्र माझा राजीनामा अद्याप अध्यक्षांनी स्विकारलेला नाही.

- Advertisement -

– राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे बंडखोर आमदार 

असे असेल पावसाळी अधिवेशन 

या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी सादर केला जाणार आहे. यानंतर २१ आणि २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा १९ आणि २० जून रोजी होईल. दरम्यान, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये देशासह राज्यात देखील युतीचा बोलबाला पहायला मिळाला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीला ४१ जागा मिळाल्याने फडणवीस सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे तर विरोधक पुरते कोमात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधक नुकत्याच झालेल्या पराभवामुळे पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कसे तोंड देणार हे देखील पहाणं तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे.


हे ही वाचा अखेर युतीचा फॉर्मूला ठरला; सेना-भाजपा लढणार १३५-१३५ जागा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -