घरमहाराष्ट्रअखेर युतीचा फॉर्मूला ठरला; सेना-भाजपा लढणार १३५-१३५ जागा

अखेर युतीचा फॉर्मूला ठरला; सेना-भाजपा लढणार १३५-१३५ जागा

Subscribe

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुूकीत देखील शिवसेना-भाजपाचा ५०-५० चा फॉर्मूला ठरला असून, यावेळी मित्रपक्षांना देखील जागा सोडण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात येत्या ३ महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकी आधीच शिवसेना भाजपामध्ये सुरु असलेली तु-तू-मै-मै संपून या दोन्ही पक्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष लोकसभेनंतर विधानसभेच्या कामाला लागले असून, विधानसभा निवडणुकीसाठी देखील युतीचा फॉर्मला ठरला आहे. आता फक्त कुणाला किती जागा सोडण्यात येणार आहेत याची फक्त औपचारीक घोषणा बाकी राहिल्याचे एका भाजपाच्या नेत्याने खासगीत बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुूकीत देखील शिवसेना-भाजपाचा ५०-५० चा फॉर्मूला ठरला असून, यावेळी मित्रपक्षांना देखील जागा सोडण्यात येणार आहेत.

असा आहे युतीचा विधानसभेचा फॉर्मूला  

लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ तर भाजपाने २५ जागा लढवल्या होत्या. यामध्ये भाजपा २३ तर शिवसेनेला १८ जागांवर यश मिळाले होते. मात्र विधानसभेला ५०-५० चा फॉर्मूला ठरला असून, शिवसेना १३५ आणि भाजपा १३५ जागा लढणार असून, उरलेल्या १८ जागा मित्रपक्षांना सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

म्हणून मित्र पक्षांना सोडणार १८ जागा 

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना एकही जागा न सोडल्यामुळे सुरुवातील मित्रपक्ष नाराज झाले होते. मात्र शिवसेना-भाजपाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल असे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी आश्वासन दिले होते. याच आश्वासनानंतर मित्रपक्षांची नाराजी दूर झाली होती. त्यामुळेच महादेव जानकर यांच्या रासप, रामदास आठवले यांच्या रिपाइ, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला विधानसभेत १८ जागा शिवसेना-भाजपा कडून सोडण्यात येणार आहे.

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे. त्यामुळे विधानसभेत देखील ५०-५० चा फॉर्म्यूला ठरला असून, उरलेल्या जागा मित्र पक्षांना सो़डण्यात येणार आहे.
– चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

- Advertisement -

मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष?

दरम्यान शिवसेनेच्या काही खात्रीलायक सूत्रांना विचारले असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून, मुख्यमंत्रीपद देखील अडीच अडीच वर्ष देण्याची चर्चा झाल्याचे सांगितले. सुरुवातीची अडीच वर्ष भाजपा आणि नंतरची अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री पद अशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाचा उद्धव ठाकरे यांची पसंती असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -