घरमहाराष्ट्रजखमी बिबट्याला अथक प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

जखमी बिबट्याला अथक प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

Subscribe

जुन्नरच्या बिबट्या निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी मादीला अथक प्रयत्नानंतर जीवनदान मिळाले आहे.

जुन्नरच्या बिबट्या निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी बिबट्या मादीला जीवनदान मिळाले आहे. ही मादी रोड अपघातात गंभीर जखमी झाली होती, तिचे वय हे पाच महिने असून तिच्यावर फिजिओथेरपी आणि मसाजद्वारे उपचार करून तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला जंगलात सोडण्यात आले आहे. मादीला बर करण्यात उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

असा घडला अपघात

तीन महिन्यापूर्वी इगतपुरी वरून मादी रस्त्यावरुन जात असताना तिचा अपघात झाला. या अपघातात या मादीचे चारही पाय पॅरॅलीस झाले. जखमी मादीला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात उपचारा करता दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिची क्स रे मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी तिला डॉक्टरांनी फिजिओथेरपी आणि मसाज ट्रीटमेंट सुरू केली. पहिल्या पंधरा दिवसात ती बसायला लागली, नंतर आठ दिवसात उभी राहायला लागून चालायला देखील लागली. तिच्यावर तसेच उपचार सुरु ठेवण्यात आले. त्यानंतरच्या आठ दिवसात ती पाळायला देखील लागली. तीन महिन्यात पुर्णतः मादी बरी झाली. त्यानंतर तिला जंगलात सोडण्यात आले. सोडताना टीमच्या संमिश्र भावना होत्या. एकीकडे आनंद होता की ती परत मुक्त संचार करेल तर दुसरीकडे ती आपल्याला सोडून जाण्याचे दुःख असल्याचे डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले आहे. मादी चालावी आणि बरी व्हावी यासाठी दिवसातून तीन वेळा मसाज करणे, खाऊ घालणे, पाणी पाजणे हे सर्व करण्यात आले असून मादीची मुलासारखी काळजी घेतली गेली होती, असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

वाचा – बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

वाचा – बदलापूरजवळील जंगलात आढळला बिबट्याचा जळलेला मृतदेह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -