घरमहाराष्ट्रआईचा मोबाईल देण्यास नकार,विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

आईचा मोबाईल देण्यास नकार,विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

Subscribe

आईनं मोबाईल न दिल्यानं नागपुरातील महाल परिसरामध्ये विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. क्रिश लुनावत असं या १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

मुलांमध्ये सध्या दिवसेंदिवस मोबाईलचं आकर्षण वाढतंय. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या मोबाईलमुळे फायदे आणि तोटेपण होताना दिसत आहेत. काही वेळा मोबाईलमुळं अनेकांनी जीवन संपवल्याचं देखील आपण ऐकलं आहे. असाच प्रकार आता नागपूरमध्ये समोर आला आहे. आईनं मोबाईल न दिल्यानं नागपुरातील महाल परिसरामध्ये विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. क्रिश लुनावत असं या १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. दरम्यान क्रिशच्या आत्महत्या प्रकरणामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाईलमुळे मुलं आभासी विश्वात

दिवसेंदिवस मुलं मोबाईलमध्ये रमताना दिसत आहेत. पालक देखील मुलांना मोबाईल देऊन त्यामध्ये त्यांचं मन रमवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मैदानी खेळापासून मुलं दुरावताना दिसत आहेत. शिवाय, वास्तव जगापेक्षा मुलं आभासी जगामध्ये जास्त रमताना दिसत आहे. केव्हा – केव्हा तर गेमच्या आहारी जाऊन मुलांनी जीवन संपवल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यात आता मुलांचा मोबाईलचा हट्ट देखील पालक पूर्ण करताना दिसतात. पण हाच मोबाईल आता मुलांसाठी जीवघेणा ठरत असून मुलं मोबाईलमुळं आत्महत्या करत आहेत. मुलांमध्ये हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून आत्महत्येसारखा मार्ग मुलं जवळ करत आहेत. पालकांनी देखील त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे मैदानी खेळांसह मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत आता तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. त्यामुळे पालकांनी देखील आता आपली मुलं काय करतात? मोबाईमध्ये मुलं कोणत्या गोष्टी जास्त वापरतात. त्याचा वापर कशा प्रकारे होतो? यावर देखील लक्ष ठेवण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -