घरमहाराष्ट्रत्या जुन्या मीम्सला अमोल कोल्हेंनी दिले सणसणीत उत्तर

त्या जुन्या मीम्सला अमोल कोल्हेंनी दिले सणसणीत उत्तर

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा काढली होती. यादरम्यान विरोधकांकडून एक मीम्स व्हायरल करण्यात आले होते. या मीम्समध्ये पंक्चर झालेल्या ट्रकच्या टायरला एक लहान मुलगा तोंडाने हवा भरत होता. या फोटोवर पंक्चर टायरला राष्ट्रवादीचे नाव तर हवा भरणाऱ्या मुलाला डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव देण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात व्हायरल केलेल्या या मीम्सला कोल्हे यांनी आज सणसणीत उत्तर दिले आहे.

खासदार कोल्हे यांनी आज फेसबुकवर हे मीम्स पुन्हा शेअर केले आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनही लिहिले आहे. कोल्हे म्हणतात, “सहज फोन चाळताना ऑगस्ट महिन्यातली एक पोस्ट समोर आली आणि सहज सुचलं…

- Advertisement -

…फुंकर तीच असते..
जी मेणबत्ती विझवू शकते अन
निखारा चेतवू शकते..
टीकेच्या वाऱ्याने भेलकांडायचं की
तेच वारं शिडात भरून घ्यायचं..
आपलं आपण ठरवायचं!

कदाचित त्यावेळी पोस्ट तयार करणारा “गोवर्धन” उचलण्याची गोष्ट विसरला असावा. महाराष्ट्रात “शरदचंद्रजी पवार” नावाचा झंझावात आला अन (पोस्ट टाकणाऱ्या व त्यावर हसणाऱ्यांना) पंक्चर वाटणारी गाडी 105 च्या स्पीडने सुसाट निघाली…”

- Advertisement -

सहज फोन चाळताना ऑगस्ट महिन्यातली एक पोस्ट समोर आली..आणि सहज सुचलं……फुंकर तीच असते..जी मेणबत्ती विझवू शकते…

DrAmol Kolhe ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 26, 2019

अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्या यात्रेचा झंझावात काढून राष्ट्रवादीतील तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता. कोल्हे यांच्यासोबत उदयनराजे भोसले देखील शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होतील, असे नियोजन केले गेले होते. मात्र आयत्यावेळी उदयनराजे यांनी शिवस्वराज्य यात्रेला टांग दिली. मात्र तरिही कोल्हे, अमोल मिटकरी आणि इतर नेत्यांनी शिवस्वराज्य यात्रा यशस्वी केली होती. विशेष म्हणजे शिवरायांचा फोटो असलेला भगवा झेंडा याच यात्रेत राष्ट्रवादीने स्वीकारला. आता पुन्हा एकदा कोल्हे यांनी जुने मीम्स शेअर करत “फुंकर तीच असते, जी मेणबत्ती विझवू शकते अन निखारा चेतवू शकते..” असा सणसणीत टोला ट्रोलर्सना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -