घरताज्या घडामोडीहिंदू जनआक्रोश मोर्चा हे मोदी, शाहांचे अपयश; खासदार संजय राऊतांची टीका

हिंदू जनआक्रोश मोर्चा हे मोदी, शाहांचे अपयश; खासदार संजय राऊतांची टीका

Subscribe

लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी रविवारी काढण्यात आलेला मोर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हे आव्हान आहे. कारण दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे. केंद्रात आठ वर्षापासून हिंदुत्वाचे सरकार आहे. अत्यंत प्रबळ आणि शक्तिमान असे दोन्ही नेते असतानाही धर्मांतर आणि लव्ह जिहादसारखे विषय घडत असतील तर हे या सरकारचे अपयश आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.

लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या मोर्चात भाजप बरोबरच शिंदे गटातील नेते सहभागी झाले होते. या मोर्चावरून खासदार राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधला. कालचा जो मोर्चा काढण्यात आला होता, तो कुणी आणि कुणाविरोधात काढला होता, ते अजून स्पष्ट झालेले नाही. मला तर असे वाटते की महाराष्ट्रातील भाजपच्या युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध मोर्चा काढला की काय? अशी शंकाही त्यांनी उपिस्थत केली.

- Advertisement -

नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ तसेच देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते स्वत:ला कडवट हिंदुत्वावादी म्हणून घेणारे नेते आहेत. दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे. तरीही धर्मांतर आणि लव्ह जिहादसारखे विषय घडत असतील तर हे या सरकारचे अपयश आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाच्या पुतळ्यासमोर अत्यंत व्यथीत मनाने सर्व जमलेले दिसत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हिंदुचा आक्रोश काय आहे हे बघायचे असेल तर या मोर्चेकरांनी काश्मीरला जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो काश्मिरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आणि संघर्ष करताहेत. ते आपल्या घरी जाऊ शकले नाहीत, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

हा हिंदू आक्रोश मोर्चा काढला आहे तो जर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला तेव्हा या मोर्चा काढणाऱ्यांच्या तोंडाला बूच का बसला होता? असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाजी महाराजांचा अपमान चालतो, मात्र, काश्मिरच्याबाबतीत यांचा हिंदू आक्रोश नाही. रामभक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या मुलायमसिंह यांना मोदींचे हिंदुत्ववादी सरकार पद्मविभूषण किताब देऊन गौरव करतो. मात्र, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान नाही, असे सांगतानाच कदाचित या सर्व मुद्यांवर हिंदू आक्रोश मोर्चा काढला गेला असेल. त्यामुळे हा जो मोर्चा निघाला तो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेविरोधात निघाला. त्याबद्दल मी मोर्चेकरांचे अभिनंदन करतो, अशा शब्दात राऊतांनी भाजपला चिमटा काढला.


हेही वाचा : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -