घरमहाराष्ट्रमहावितरणच्या वीजबिलाचा फोटो होणार 'गायब'!!

महावितरणच्या वीजबिलाचा फोटो होणार ‘गायब’!!

Subscribe

ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमधील होणारे वाद टाळण्यासाठी आता महावितरणने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण, महावितरणने कारण, राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांचा वीजबिलावरील फोटो आता हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरणच्या वीजबिलावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमधील वादाचे वादळ यापुढे थोड्याफार प्रमाणात शांत होणार आहे. कारण, राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांचा वीजबिलावरील फोटो आता हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण यापुढे मोबाईल अॅपद्वारे घेतली जाणारी आकडेवारी एसएमएसवर मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांच्या वीजबिलावरून आता फोटो नाहीसा होणार आहे. वीज बिलावरील आकडेवारी स्पष्ट न दिसणे, अपलोड झालेला फोटो न दिसणे, एकच फोटो अनेक बिलावर येणे, मीटर रिडींग झालेला फोटो न दिसणे यासारख्या अनेक तक्रारी वीज ग्राहकांमार्फत केल्या जात होत्या. मीटर रिडींगसाठी एसएमएसच्या पद्धतीमुळे फोटोबाबतच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होईल असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना वाटतो. महावितरणमार्फत नेमण्यात आलेल्या बिलिंग एजन्सीकडून सध्याच्या पद्धतीनुसार मोबाईलवर फोटो काढले जात होते. पण या कामाची गुणवत्ता अतिशय सुमार असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. स्पॉट बिलिंगच्या तक्रारीमुळेच याआधी मोबाईलवर फोटो उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण येत्या तीन महिन्यात सगळ्या बिलांवरील फोटो काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाद टळणार

महावितरणने यापुढच्या काळात संपुर्ण सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांची रिडींग मोबाईलचा वापर करून घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या प्रत्येक रिडींगनंतर ग्राहकांना एसएमएस मिळणार आहे. तसेच वीजबिल तयार झाल्यानंतरही ग्राहकाला तत्काळ एसएमएस मिळणार आहे. शिवाय, वीजबिल भरण्याच्या मुदतीची आठवण करून देण्यासाठीही ग्राहकांना एसएमएस मिळणार आहेत. महावितरणकडून देखभाल दुरूस्तीसह, मीटर रिडींगचे असे 6 कोटी एसएमएस राज्यातील ग्राहकांना पाठवण्यात येत आहेत. महावितरणकडे राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांचा मोबाईल डेटाबेस आहे. तसेच 29 लाख 85 हजार ग्राहकांकडून महावितरणचे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. राज्यातील 84 हजार 378 ग्राहकांनी मोबाईल अॅपचा वापर करून वीज जोडणी घेतली आहे. मोबाईल अॅपचा वापर करून राज्यातील ३.५० लाख वीज ग्राहक महिन्यापोटी 45 कोटी रूपये वीजबिल भरतात.

- Advertisement -

सेंट्रलाईज बिलिंग

महावितरणने बिलावरील फोटो गायब करतानाच काही महत्वाचे निर्णयही घेतले आहेत. यापुढे बिलिंगचे काम करणाऱ्या एजन्सीच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे. राज्यातील ६६३ डिव्हीजनमध्ये बिलिंग एजन्सीला आता वीजबिलासाठी रिडिंग घेणे आणि वीजबिल वितरण करणे इतकच काम असणार आहे. वीजबिल तयार करण्याचे काम महावितरणच्या सेंट्रलाईज बिलिंगच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे वीजबिलाचे वाद आता एजन्सीच्या पातळीवर राहणार नाहीत. हे वाद महावितरणच्या पातळीवरच सोडवले जातील. सरासरी ३ ते ५ टक्के वीजबिलाचे वाद होतात. वीजबिलाची प्रक्रिया वेळेत व्हावी तसेच महिन्यापोटीच्या खर्चाची रक्कम त्याच महिन्यात वसुल व्हावी हा उद्देश आहे. एजन्सीच्या वीजबिलातील दुरूस्तीचा हस्तक्षेप सेंट्रलाईज्ड बिलिंगमुळे संपुष्टात येईल.

वाचा – महावितरण ग्राहकांना नवा शॉक द्यायच्या तयारीत!

वाचा – ग्राहकसेवेसाठी महावितरणची नवीन योजना

वाचा – शेतकऱ्यांवर वीजदरवाढीची वीज कोसळणार

वाचा – सावधान! तुमचं लाईट बिल वाढणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -