घरताज्या घडामोडीMaharashtra Electricity Demand : उकाडा ऑन ! राज्यात विजेच्या मागणीने गाठला यंदाच्या...

Maharashtra Electricity Demand : उकाडा ऑन ! राज्यात विजेच्या मागणीने गाठला यंदाच्या हंगामातील उच्चांक

Subscribe

राज्यातील उकाड्याला सुरूवात झाली असून राज्यात दररोज विजेची मागणीचा आकडा नवनवे उच्चांक करतोय. अशातच महावितरणकडून यंदाच्या वर्षातील सर्वाधिक विजेच्या मागणीचा उंच्चांक नुकताच गाठण्यात आला आहे. विजेच्या मागणीच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक असा विजेचा पुरवठा करण्यात महाराष्ट्राला यश आले आहे. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक असा विजेचा पुरवठा मानला जात आहे. यंदाच्या मार्च ते मे या कालावधीत हाच विजेच्या मागणीचा आकडा नवे उच्चांक गाठेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (MSEDCL record breaking power demand electricity supply in Maharashtra in record summer begins)

रेकॉर्ड ब्रेकिंग विजेचा पुरवठा 

मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला आहे. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवरच्या या सर्वाधिक मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने वीजपुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. याआधी ९ मार्च २०२१ रोजी २२ हजार ३३९ मेगावॅट विक्रमी विजेचा पुरवठा करण्यात आला होता.

- Advertisement -

राज्यात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरवात झाली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. यामध्ये मंगळवारी (दि. ८) राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार ९५५ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८१ लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

 

- Advertisement -

ऊर्जामंत्र्यांकडून टीमचे कौतुक 

 

महावितरणच्या विक्रमी कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून उपलब्धतेचे नियोजन करीत विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यात आली. महावितरणने आतापर्यंत केलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासोबतच दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे हे यश आहे. त्यामुळे तब्बल २३ हजार मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या विजेचे वहन सध्या अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून शक्य झाले आहे.

कुठून किती वीज उपलब्ध ?

महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून त्यात सर्वात जास्त महानिर्मिती ६ हजार ८७४ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार १५४ मेगावॅट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ८५३ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. सोबतच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतांमधून सौर ऊर्जा- २३३५ मेगावॅट, पवन ऊर्जा- १६६ मेगावॅट तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून १२०० मेगावॅट असे एकूण ३ हजार ९९१ मेगावॅट वीज उपलब्ध झाली.

उर्वरित विजेची मागणी ही कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ३२० मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून १ हजार ३५३ मेगावॅट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ६३० मेगावॅट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -