घरAssembly Battle 2022Punjab Assembly Election 2022: पंतप्रधान पंजाबमध्ये करणार जंगी प्रचार, तीन रॅलींमधून जनतेला...

Punjab Assembly Election 2022: पंतप्रधान पंजाबमध्ये करणार जंगी प्रचार, तीन रॅलींमधून जनतेला संबोधित करणार

Subscribe

पंजाबमध्ये निवडणुकीच्या प्रचारांना उधाण झालय. जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांनी आता प्रचारासाठी जोर लावला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारीला पंजाब दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी ते जालंधरमधून मोठी निवडणूक रॅली घेणार आहेत. तसेच पंजाबच्या नागरिकांशी ते थेट संवाद साधणार आहेत. मात्र, भाजपचा उत्साह अधिक वेगाने वाढला असून आता मोदी एकूण निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.

नरेंद्र मोदी १४, १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील नागरिकांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा पंजाबमध्ये भाजपसाठी रॅली करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या रॅलीसाठी भाजपने खास योजना आखली आहे. नरेंद्र मोदींच्या रॅलीद्वारे माळवा, दोआबा आणि माझा हे तिन्ही प्रदेश व्यापण्याची व्यूव्हरचना भाजपने केली आहे.

- Advertisement -

भाजप प्रदेश सरचिटणीस सुभाष शर्मा यांनी सांगितले की, पंजाबमधील राजगच्या प्रचार अभियानाला जोर देण्यासाठी मोदी १४, १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी तीन संभांना संबोधित करणार आहेत. मोदी १४ फेब्रुवारी रोजी जालंधरमध्ये पहिली जाहीर सभा घेणार आहेत. तसेच १६ फेब्रुवारी रोजी पठाणकोटमध्ये दुसरी रॅली घेणार आहेत आणि १७ फेब्रुवारी रोजी अबोहरमध्ये तिसऱ्या सभेला संबोधित करणार आहेत.

पीएम मोदींच्या पंजाब दौऱ्यामुळे एनडीएच्या उमेदवाराचे मनोबल उंचावेल, अशी भाजपला आशा आहे. तसेच त्यांच्या जाहीर सभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलेल आणि निवडणूक लढवणाऱ्या एनडीएच्या सर्व उमेदवारांचे मनोबल वाढेल, असा दावा शर्मा यांनी केलाय.

- Advertisement -

दरम्यान, भाजप कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल युनायटेड यांच्यासोबत युती करून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे मोदींनी मंगळवारी घेतलेल्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये सांगितले.


हेही वाचा : Punjab Assembly Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १४ फेब्रुवारीला पंजाब दौरा, जालंधरमध्ये मोठी सभा होणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -